Shrimant Kokate : इतिहासावरील पुस्तके पुराव्यांशिवाय लिहिली; श्रीमंत कोकाटे यांची जाहीर कबुली

359

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना मनुस्मृतीप्रमाणे मारले, याला कोणताही तार्किक किंवा कोणताही समकालिन आधार नाही. तर्काला व्याप्तीची गरज असते. मनुस्मृतीप्रमाणे मारले कोणताही संदर्भ नाही, कोणताही ऐतिहासिक आधार नाही. आम्ही ज्या काळात संभाजी ब्रिगेडसोबत तार्किक पद्धतीने काम करत होतो, त्याला व्याप्ती मिळालेली नाही. छत्रपती संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे मारलेले नाही. स्वतः औरंगजेबच क्रूर आणि पाताळयंत्री होता. साकी मुस्तेद खान, भिमसेन सक्सेना हे औरंगजेबाच्या पदरी असलेले इतिहासकार आहेत. हे दरबारी इतिहासकार सांगतात, औरंगजेबाने अत्यंत निर्दयपणे आणि क्रूरपणे हाल हाल करून मारले. माझ्या पुस्तकाचा जो संदर्भ घेतला जातो, त्याला कोणताही मनुस्मृतीचा किंवा ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध नाही, अशी कबुली स्वतः संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate) यांनीच दिली आहे. ते एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात बोलत होते.

(हेही वाचा – Tejas Fighter Jet : अमेरिकेहून तेजसचे पहिले इंजिन आले ! कंपनीने सांगितले का उशीर झाला…)

काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई (Hussain Dalwai) यांनी औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) हत्या केली, असे वक्तव्य केले आहे. त्या विषयावर स्पष्टीकरण देतांना श्रीमंत कोकाटे यांनी आपल्याच लिखाणाविषयी सपशेल शरणागती पत्करली.

आतापर्यंत अनेक राष्ट्रप्रेमींनी ब्रिगेडींच्या विखारी प्रचाराला ऐतिहासिक पुराव्यांनिशी आव्हान दिले आहे. तरीही सर्व तथ्ये नाकारून ब्रिगेडींनी इतिहासाची विकृत मांडणी करून जातीवादाला प्रोत्साहन दिले. आता श्रीमंत कोकाटे यांनीच ‘आम्ही मांडलेल्या तर्काला व्याप्ती मिळाली नाही’, असे म्हटले आहे. त्यामुळे कोणतेही ऐतिहासिक पुरावे नसलेल्या आणि विशिष्ट विचारधारेच्या तर्काच्या आधारे मांडलेल्या या पुस्तकांची मान्यता रद्द का करू नये, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.