श्रीवर्धन ते मुंबई बसच्या चालकाने वाहकाला बस ६० किलोमीटर चालवावी लागली. (Shrivardhan Mumbai Bus) आबाजी धडस असे मद्यपी चालकाचे नाव आहे. श्रीवर्धन ते मुंबई ही बस २२ सप्टेंबरला संध्याकाळी साडेचार वाजता श्रीवर्धन स्थानकातून निघाली होती. बस माणगाव एस टी स्टँड येथे थांबली असता चालकाने तेथेच मद्यपान केले. चालकाने मद्यपान केल्याचे कंडक्टरच्या लक्षात येताच त्याने श्रीवर्धन डेपोशी संपर्क साधला. त्यानंतर कंडक्टर हा कंडक्टर कम ड्रायव्हर असल्याने मद्यपी चालकाला बाजूला केला. त्यानंतर कंडक्टरने एस टी बस ताब्यात घेतली. पुढे सुमारे 60 किलो मीटर कंडक्टरनेच एसटी बस चालवत आणली. रामवाडी येथे बस असताना चालकाविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली. एसटी प्रशासनाने या मद्यपी चालकावर निलंबनाची कारवाई केली आहे. (Shrivardhan Mumbai Bus)
(हेही वाचा – One Nation One Election : कोविंद समितीची पहिली बैठक; कोण होते हजर, कोण गैरहजर?)
मद्यपी चालकाला बाजूला करत एसटीच्या कंडक्टरनेच 60 किलोमीटरपर्यंत बस चालवली. चालकाने मद्यपान केल्यामुळे कंडक्टरला बस चालवावी लागली आहे. वर्धन ते मुंबई प्रवासादरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चालकाविरुद्ध रामवाडी येथील एस टी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यापूर्वीही मद्यपान करून बस चालवण्याचे आणि त्यामुळे अपघात घडण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे अशा प्रकारावर कठोर करावी करायला हवी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. (Shrivardhan Mumbai Bus)
हेही पहा –