कोरोना लसीकरण मोहिम संपताच देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए लागू करणार असल्याचे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केले आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्या भेटीवेळी शाह यांनी सीएए लागू करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती शुभेंदु अधिकारी यांनी दिली आहे. पश्चिम बंगालमधील भाजपाकडून होत असलेले काम तसेच तेथील समस्यांबाबत शुभेंदु अधिकारी यांनी अमित शाह यांच्याशी चर्चा केली. सत्ताधारी तृणमूल काॅंग्रेसमधील 100 भ्रष्टाचारी नेत्यांची यादी शाह यांच्याकडे सोपवली असल्याचेही अधिकारी यांनी सांगितले.
CAA कायदा संसदेत पारित झाल्यानंतर, मोठं आंदोलन झालं होत. देशभरासह दिल्लीतील शाहीन बाग इथे झालेल्या आंदोलनामुळे हा कायदा चर्चेत आला. या कायद्याला प्रंचड विरोध होत असतानाच, कोरोनाचा भारतात शिरकाव झाला. आंदोलन थांबवावं लागलं. पण आता पुन्हा एकदा हा कायदा लागू केला जाणार असल्याचे, शुभेंदू अधिकारी यांनी सांगितले आहे. अशात आता हा कायदा लोक स्वीकारणार की त्याला विरोध करणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.
( हेही वाचा: केदार दिघेंविरोधात बलात्कार पीडित तरुणीला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल )
काय आहे CAA?
धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या देशांतील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या नागरिकांनी हिंदुस्थानात स्थलांतर केले. 31 डिसेंबर 2014 पर्यंत हिंदुस्थानात आलेल्या अशा नागिरकांना बेकायदा स्थलांतरित न मानता त्यांना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्याची तरतूद सीएए कायद्यामध्ये आहे.
Join Our WhatsApp Community