मुंबई महापालिकेत सहायक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली असून सहआयुक्त रमाकांत बिरादर हे ३० जून रोजी सेवा निवृत्त होत असल्याने त्यांच्या रिक्त जागेचा अतिरिक्त कार्यभार जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोष धोंडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर धोंडे यांची बदली बी विभागाच्या सहायक आयुक्तपदावर करण्यात आली असून जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तपदी मृदुला अंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (BMC)
संतोषकुमार धोंडे यांच्याकडे परिमंडळ सहाच्या उपायुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार
परिमंडळ ६चे उपायुक्त रमाकांत बिरादर हे रविवार ३० जून २०२४ रोजी सेवा निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी आता सर्वात वरिष्ठ सहायक आयुक्त म्हणून संतोषकुमार धोंडे यांना उपायुक्तपदी बढती देण्यात आली आहे. त्यामुळे जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्तपदी असलेल्या धोंडे यांची बदली बी विभागाच्या सहायक आयुक्तपदी करण्यात आली असून त्यांच्याकडे बिरादर यांच्याकडील उपायुक्तपद परिमंडळ सहाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे किरण दिघावकर, विश्वास मोटे यांच्यासह आता संतोषकुमार धोंडे हे विभागाच्या सहायक आयुक्त पदासह उपायुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. (BMC)
अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार
शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे विभागाच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या सहायक आयुक्त म्हणून कामकाज पाहणाऱ्या सहायक आयुक्त मृदुल अंडे यांच्याकडे जी दक्षिण विभागाचा पदभार सोपवण्यात आला आहे. जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त पदाबरोबरच संपूर्ण मुंबईच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभारही अंडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. (BMC)
(हेही वाचा – विधानसभा निवडणुकीत महायुतीच बहुमत मिळवणार; Ashish Shelar यांचा विश्वास)
बाजार विभागाला सक्षम अधिकारी
के पश्चिम विभागामध्ये अनधिकृत इमारतींवर हातोडा चालवणाऱ्या सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहाण यांची बदली शहरातील एफ उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तपदी मागील दहा दिवसांपूर्वी करण्यात आली होती. एफ उत्तर विभागासह चौहाण यांच्याकडे सी विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. परंतु आता सी विभागाचा पदभार काढून घेत त्यांच्याकडे बाजार विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. डॉ.चौहाण यांना बाजार विभागाचे चांगले ज्ञान असून सहायक आयुक्त म्हणून परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी ते बाजार विभागातच कार्यरत होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने बाजार विभागाच्या सहायक आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी डॉ चौहाण यांच्याकडे सोपवून एकप्रकारे बाजार विभागाला सक्षम अधिकारी देण्याचा प्रयत्न केला आहे. (BMC)
सी विभागाच्या सहायक आयुक्तपदी विधाते
तर महापालिकेच्या जी उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता विष्णू विधाते यांच्याकडे स्वत:च्या पदाचा कामकाजासह सी विभागाच्या सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आले. शुक्रवारी २८ जून रोजी सामान्य प्रशासनाने महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे सहआयुक्त मिलिन सावंत यांच्या स्वाक्षरीने याबाबतच्या बदली तथा नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. (BMC)
अशाप्रकारे झालेल्या आहेत बदल्या
- संतोषकुमार धोंडे, बी विभागाचे सहायक आयुक्त, परिमंडळ ६च्या उपायुक्त पदाचा अतिरिक्त कारभार
- डॉ. पृथ्वीराज चव्हाण, एफ विभागाचे सहायक आयुक्त, बाजार विभागाचा अतिरिक्त कार्यभार
- मृदुला अंडे, जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त, अतिक्रमण निर्मुलन विभागाचा अतिरिक्त कार्यभार
- विष्णू विधाते, जी उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता, सी विभागाच्या सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community