Pilot Training Centre: अमरावतीत दक्षिण आशियामधील सर्वात मोठे पायलट ट्रेनिंग सेंटर

या प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती शहराचा विकासाला चालना मिळेल आणि विमानतळाला नवीन ऊर्जा मिळेल.

301
Pilot Training Centre: अमरावतीत दक्षिण आशियामधील सर्वात मोठे पायलट ट्रेनिंग सेंटर
Pilot Training Centre: अमरावतीत दक्षिण आशियामधील सर्वात मोठे पायलट ट्रेनिंग सेंटर

अमरावती (बेलोरा) विमानतळावर टाटा समूहाच्या सहकार्याने दक्षिण आशियामधील सर्वात मोठे पायलट ट्रेनिंग सेंटर सुरु होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात दिली. ज्या जिल्ह्यात कधीतरी विमान उतरत होते, अशा अमरावती विमानतळावर दक्षिण आशियामधील सर्वात मोठे पायलट ट्रेनिंग सेंटर सुरू सांगितले. करण्यासाठी एअर इंडियाची संचालक कंपनी टाटा कंपनीशी विशेष करार करण्यात आल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Pilot Training Centre)

एअर इंडिया ही आता टाटाची कंपनी आहे. या कंपनीने हजारो नवीन विमाने खरेदी करण्याची प्रकिया सुरू केली आहे. या हजारो नवीन विमानांना उडवण्यासाठी पायलट लागतील. त्यासाठी टाटा कंपनीशी एक विशेष करार करण्यात आला असून हजारो पायलट तयार करण्यासाठी अमरावती विमानतळावर दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा – Restaurants With live Music: ‘या’ लोकप्रिय उपाहारगृहात घ्या संगीतासह भोजनाचा आनंद ! )

या प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती शहराचा विकासाला चालना मिळेल आणि विमानतळाला नवीन ऊर्जा मिळेल. या केंद्रात हजारो तरुणांना पायलट प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे-जे गरजेचे व शक्य आहे ते-ते सर्व करून विकासाचा समतोल राखण्याचे नियोजन सरकारचे असल्याचा उल्लेखही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आवर्जून केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.