रशिया-युक्रेन युद्धाची शंभरी! जागतिक मंदीने वाढली बेकारी! भारतावरही परिणाम

117

रशिया-युक्रेन युद्ध सुरु होऊन शंभर दिवस पूर्ण झाली, तरीही हे युद्ध संपायचे नाव घेत नाही. कारण युक्रेनला ‘नाटो’ संघटनेच्या देशांचा पाठिंबा मिळत आहे. तसेच अमेरिकाही आर्थिक साहाय्य करत आहे. त्यामुळे अमेरिकेनंतर जगात दुसरा बलाढ्य देश असलेल्या रशियाला १०० दिवस युद्ध करूनही युक्रेनला हरवता आले नाही. याचे दुष्परिणाम मात्र जागतिक पातळीवर होऊ लागले आहेत. या युद्धामुळे जगभरातील देशांवर मंदीचे ढग जमले आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला बसला फटका

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी हे संकेत दिले आहेत. एलन मस्क हे प्रसिद्ध इलेक्ट्रिक कर कंपनी टेस्लाचे मालक आहेत. या कंपनीवर जागतिक मंदीचे परिणाम झाले असून त्यांनी त्यांच्या कंपनीत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा मेल त्यांनी पाठवला आहे. आपल्याला सध्याच्या आर्थिक स्थितीमुळे मोठ्या प्रमाणात निराशावादी संवेदना होत आहेत. त्यामुळे आपल्याला टेस्ला कंपनीमधून १० टक्के कर्मचारी कपात करावी लागणार आहे, असे मस्क यांनी त्यांच्या ईमेलमध्ये म्हटले आहे. त्याआधी मस्क यांनी कंपनीच्या वेगवेगळ्या सेंटरमधून मुख्यालयाचे काम घरून करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मूळ ठिकाणी कामावर हजर व्हावे अन्यथा कंपनी सोडून जावे, अशा कठोर शब्दांत सुनावले आहे. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याने आठवड्याला किमान ४० तास काम करावे, असेही मस्क यांनी म्हटले आहे. रॉयटर्सने ही माहिती दिली आहे.

(हेही वाचा LPG Subsidy: … तरच मिळणार घरगुती गॅस सिलिंडरवर ‘सबसिडी’, ‘या’ लोकांनाच दिलासा)

भारतातही कामगार कपात

दुसरीकडे भारतातही काही टेक आणि स्टार्टअप कंपन्यांनी कामगार कपात सुरु केली आहे. Cars24 कंपनीने ६०० कर्मचाऱ्यांने कामावरून काढले आहे, तर Unacademy नेही ६०० कर्मचाऱ्यांना घरी बसवले आहे. Lido Learning ने कंपनीला टाळे ठोकले आहे. कर्मचाऱ्यांना कित्येक महिन्यांपासून पगार दिला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. Meesho, Furlenco आणि ट्रेलसारख्या कंपन्यांनीही कर्मचारी कपात सुरु केली आहे. Netflix ने देखील 150 कर्मचारी आणि डझनभर कंत्राटदारांना कमी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.