खलिस्तान्यांना खुद्द शिखांनीच दिले सडेतोड उत्तर; हातात तिरंगा घेऊन… 

133

सध्या पंजाबमध्ये खलिस्तान्यांकडून भारतद्वेष पसरवला जात आहे. त्यामुळे शिखांमध्ये खलिस्तान्यांची दहशत निर्माण झाली, खलिस्तान्यांनाही थेट परदेशात भारताच्या विरोधात मोर्चा उघडला. खलिस्तान्यांनी लंडनच्या भारतीय उच्चायुक्तालयातला तिरंगा हटवला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून नवी दिल्लीमधल्या ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाबाहेर शिख समुदायाने आंदोलन केले. सोमवारी चाणक्य पुरीमधल्या ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. त्याविरोधात भारतातला शीख  समुदाय आक्रमक झाला आहे.

दिल्लीतल्या ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर शिख समुदाय तिरंगा आणि फलक घेऊन पोहोचला होता. भारत हमारा स्वाभीमान है, अशा घोषणा शीख समुदायाकडून देण्यात आल्या. भारताचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही या आंदोलनादरम्यान शीख समुदायाने दिला आहे. रविवारी लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तान्यांनी घोषणाबाजी केली, तसेच उच्चायुक्तालयातल्या कार्यालयातून भारतीय तिरंगा उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा हल्ला अपयशी ठरला असल्याचे उच्चायुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच यामध्ये दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले, पण त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. याप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे, असे लंडनमधल्या पोलिसांनी सांगितले आहे. लंडनमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर भारताने ब्रिटनच्या उपउच्चायुक्तांकडे सुरक्षेच्या अभावाबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेबाबत युके सरकार गंभीर नसल्याचे कठोर वक्तव्य भारतीय परराष्ट्र खात्याकडून करण्यात आले आहे. तसेच उच्चायुक्तालयाच्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेतली चूक अस्वीकार्य असल्याचेही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटनच्या उपउच्चायुक्तांना सांगितले आहे. लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तालयात झालेली ही घटना लज्जास्पद आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहे. युके सरकार उच्चायुक्तालयाची सुरक्षा गांभिर्याने घेईल, असे स्पष्टीकरण ब्रिटन सरकारमधल्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा काँग्रेसच्या खोडसाळपणाचा भाजपच्या नेत्यांनी घेतला खरपूस समाचार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.