नांदेडमध्ये शिखांकडून दिल्ली आंदोलनाची पुनरावृत्ती! नेटकऱ्यांनी झोडपले! 

पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ४०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. १७ जणांना अटक करण्यात आली आहे. या दंगलीचे व्हिडीओ सोशल मीडियामध्ये सर्वत्र व्हायरल होत आहेत.

129
नांदेड जिल्ह्यातील सचखंड गुरुद्वार परिसरात शिखांनी अक्षरशः नंग्या तलवारी नाचवून पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. कोरोनामुळे निर्बंध असल्याने दरवर्षी होणारी ‘हल्ला महल्ला (हल्लाबोल) मिरवणूक’ काढू नये, असे पोलिसांनी म्हटले. त्यामुळे शीख संतप्त झाले आणि त्यांनी दिल्ली दंगलीप्रमाणे दंगल घडवून आणली. यावर सोशल मीडियात नेटकऱ्यांनी दंगलखोर शिखांना अक्षरशः खडसावले आहे.

तलवारीने पोलिसांवर केला हल्ला!

नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा परिसरात दरवर्षी शीख धर्मीय हल्ला महल्ला (हल्लाबोल) मिरवणूक काढतात. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे शासनाने राज्यभरात कडक नियमावली लावली असून सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये, असे पोलिसांनी शीख धर्मियांना सांगितले होते. त्यामुळे या ठिकाणी गुरुद्वारा परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु पोलिसांनी कार्यक्रमाला विरोध केल्याने काही शीख तरुण संतप्त झाले. त्यांनी थेट पोलिसांवर हल्ला केला. हातात नंग्या तलवारी घेऊन पोलिसांवर हल्ला केला.

४०० जणांवर गुन्हा दाखल!

या हल्ल्यात पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड केली. यात पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यासह त्यांचे अंगरक्षक आणि चार पोलीस जखमी झाले. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. जखमी पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ४०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. १७ जणांना अटक करण्यात आली आहे. या दंगलीचे व्हिडीओ सोशल मीडियामध्ये सर्वत्र व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर दंगलखोर शिखांवर टीका! 
हा तर अतिरेकी हल्ला आहे असे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे, तर काहींनी हा खलिस्तान्यांनी हल्ला केला आहे, असे म्हटले आहे.

लाला किल्ल्यानंतर आता नांदेडमधील गुरुद्वारा. कोरोनाच्या कारणाने पोलिसांनी शिखांना धार्मिक कार्यक्रमासाठी परवानगी नाकारल्याने खलिस्तानी शिखांनी पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. हिंदू आणि शीख यांच्यात दरी निर्माण करण्याच्या काटकारस्थानाचा हा एक भाग आहे, असेही नेटकरी म्हणाले.

वाहेगुरू माझ्या भारत देशाला वाचावा! या दंगलखोरांकडून माझ्या महाराष्ट्राला वाचावा! लोकांना शिखांसोबत सुरक्षित वाटते. पण आधी लाल किल्ला आणि आता नांदेड…हे लोक शीख धर्म बुडवत आहेत. भारतात कुणालाही तलवार बाळगण्याची परवानगी नाही. लाज वाटते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.