Sikkim Flood : सिक्कीममध्ये ७ जवानांसह २६ जणांनी गमावले प्राण; मदतकार्याला वेग

सिक्कीममध्ये 3 ऑक्टोबर रोजी ढग फुटल्यानंतर तीस्ता नदीला आलेल्या पुरामुळे सुमारे 25 हजार लोक प्रभावित झाले आहेत. आतापर्यंत 26 जणांचे मृतदेह सापडले असून त्यात 7 लष्करी जवानांचा समावेश आहे, तर 150 जण अद्याप बेपत्ता आहेत.

160
Sikkim Flood : सिक्कीममध्ये मृत्यूंची संख्या वाढली; ७ जवानांसह २६ जणांनी गमावले प्राण
Sikkim Flood : सिक्कीममध्ये मृत्यूंची संख्या वाढली; ७ जवानांसह २६ जणांनी गमावले प्राण

सिक्कीममध्ये आलेल्या पुरानंतर तेथे मदतकार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे. (Sikkim Flood) आयटीबीपीसह आर्मी, एअर फोर्स, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीमही रात्रंदिवस काम करत आहे. सिक्कीममधील विध्वंसामुळे ७ लष्करी जवानांसह २६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचवेळी लष्कर-एनडीआरएफची टीम बेपत्ता असलेल्या १४२ जणांचा शोध घेत आहेत. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ३ ऑक्टोबर रोजी सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे मोठा विनाश झाला आहे. (Sikkim Flood)

(हेही वाचा – Help to tribal Women : आदिवासी गर्भवतींना सरकार करणार ‘ही’ मदत; काय आहे सरकारचा अभ्यास)

आयटीबीपीच्या बचाव मोहिमेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. वास्तविक, उत्तर सिक्कीम भागात १६ हजार फूट उंचीवर आलेल्या पुरामुळे ६८ लोक ३ दिवसांपासून अडकून पडले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढणे मोठे आव्हान बनले होते. त्यानंतर आयटीबीपीचे जवान या लोकांसाठी देवदूत बनून आले. आयटीबीपीने दोरीच्या साहाय्याने बचाव मोहीम राबवून सर्व ६८ जणांना सुखरूप बाहेर काढले.

सिक्कीममध्ये बचावकार्य सुरूच आहे

पूर आणि विध्वंसाच्या दरम्यान लष्करही मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. राज्यात अनेक ठिकाणी मदत शिबिरेही चालवली जात असून, त्यामध्ये उपचारासोबतच लोकांसाठी जेवण आणि पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. लाचेन आणि लाचुंगमध्ये तीन हजारांहून अधिक पर्यटक अडकले असल्याची माहिती आहे. तीन दिवसांपूर्वी तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या विध्वंसाचे दृश्य आजही राज्यात पाहायला मिळत आहे. ढगफुटीनंतर तीस्ता नदीने एवढे भयंकर रूप धारण केले की जोरदार प्रवाहात अनेक वाहने वाहून गेली. जी वाहने राहिली, ती ढिगाऱ्याखाली दबली गेली. पूर येऊन ३ दिवस उलटले, पण विनाशाची चिन्हे अजूनही दिसत आहेत. घराच्या पहिल्या मजल्यापर्यंत मातीचे ढिगारे आहेत. (Sikkim Flood)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.