- ऋजुता लुकतुके
दिवाळीच्या पूर्वी सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या किमती वाढताना दिसत आहेत. आणि त्यातच चांदीने १ लाख रुपयांचा टप्पा दसऱ्याच्या मूहूर्तावर पार केला आहे. राजधानी दिल्लीबरोबरच दक्षिणेच्या काही राज्यांत चांदी १ लाख रुपयांच्यावर पोहोचली आहे. चांदीच्या किमतीत तीव्र वाढ झाल्यानंतर, दिल्लीतील चांदीचा प्रति किलोचा दर हा १,०१,००० रुपयांच्या वर आहेत. हैदराबादमध्ये चांदीचा दर १,०३,००० रुपये प्रति किलो आहे. केरळमध्येही चांदी १,०३,००० रुपये प्रति किलोच्या वर पोहोचली आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये ते ९७,००० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. यापूर्वी ११ ऑक्टोबर रोजी चांदीच्या दरात किलोमागे २,००० रुपयांची वाढ झाली होती. (Silver Price)
(हेही वाचा – BEST कडून ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या बातमीची दखल; मोठ्या बसेस, स्वस्त प्रवासामुळे दिलासा!)
देशात सोनं खूप महाग झालं आहे आणि त्यामुळेच ग्राहकांचा कल सोन्याऐवजी चांदी घेण्याकडे वाढला आहे. खासकरून गुंतवणूकदारांनी गुंतवणूक म्हणून चांदीला पसंती दिली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातूनही चांदीची मागणी वाढल्यामुळे दर वाढले आहेत. आणि सातत्यपूर्ण वाढ बघता चांदीला गुंतवणूक म्हणून पसंती दिली जात आहे. आताही गुंतवणूकदार सोन्यापेक्षा चांदीला महत्त्व देत आहेत. हे चित्र किमान सणाचा हा हंगाम कायम राहील असा अंदाज आहे. (Silver Price)
(हेही वाचा – Bangladesh मध्ये विजयादशमीला २ हिंदू तरुणींची हत्या)
अहमदाबादमध्ये चांदीची किंमत ९७,००० रुपये प्रति किलो आहे.
अयोध्येतही चांदीची किंमत ९७,००० रुपये प्रति किलो आहे.
दिल्लीत चांदीची किंमत १,०१,००० रुपये प्रति किलो आहे.
हैदराबादमध्ये चांदीची किंमत १,०३,००० रुपये प्रति किलो आहे.
केरळमध्ये चांदीची किंमत १,०३,००० रुपये प्रति किलो आहे. (Silver Price)
(हेही वाचा – Education fee hike : इंग्रजी शाळांच्या अव्वाच्या सव्वा वाढलेल्या शैक्षणिक शुल्कामुळे पालकांची कोंडी)
आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीच्या दरात वाढ होत आहे. या वाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर १.५८ टक्क्यांच्या वाढीनंतर ३१.७३५ डॉलर प्रति औंसवर पोहोचला असून सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. (Silver Price)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community