SIM Card Protection : तुमच्या नावावर असलेलं सिम दुसरंच कुणी वापरत नाही ना कसं तपासाल?

SIM Card Protection : बनावट सिममुळे मोठे घोटाळे झाले आहेत.

72
SIM Card Protection : तुमच्या नावावर असलेलं सिम दुसरंच कुणी वापरत नाही ना कसं तपासाल?
  • ऋजुता लुकतुके

हल्ली आर्थिक घोटाळ्यांपासून सगळ्यांनीच सावध राहण्याची गरज आहे आणि काही सोप्या सवयी आपल्याबरोबरच इतरांनाही त्यापासून सुरक्षित ठेवू शकतात. बरेचसे ऑनलाईन घोटाळे हे सिम कार्ड वापरून होतात. अगदी इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी सिम कार्ड लागतं आणि सायबर भामटे वापरात नसलेली सिम लक्ष्य करून आपलं काम फत्ते करतात. तुमचं सिमकार्ड अशा कामांसाठी वापरलं जात नाही ना हे तपासून पाहणं अगदी सोपं आहे. (SIM Card Protection)

तुमच्या आयडीवर किती सिम सक्रिय आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. तुमच्या नावावर किती सिम आणि कोणते नंबर ॲक्टिव्ह आहेत हे तुम्ही २ मिनिटांत घरबसल्या शोधू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. (SIM Card Protection)

(हेही वाचा – Veer Savarkar : राष्ट्रप्रेमींच्या उदंड प्रतिसादामुळे ‘स्वातंत्र्यवीर लाईट अँड साऊंड शो’चे ११ जानेवारीला २ सत्रांत प्रसारण)

  • सर्व प्रथम tafcop.dgtelecom.gov.in पोर्टलवर जा.
  • येथे बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी च्या मदतीने लॉगिन करा.
  • आता तुम्हाला तुमच्या आयडीवरून चालू असलेल्या सर्व नंबरचे तपशील मिळतील.
  • यादीत तुम्हाला माहीत नसलेला कोणताही क्रमांक असेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता.
  • यासाठी नंबर आणि ‘नॉट माय नंबर’ निवडा.
  • आता खालील रिपोर्ट बॉक्सवर क्लिक करा.
  • तक्रार दाखल केल्यानंतर, तुम्हाला तिकीट आयडी संदर्भ क्रमांक देखील दिला जातो.
  • यानंतर तो नंबर बंद होईल किंवा तुमच्या आधार कार्डमधून काढून टाकला जाईल. (SIM Card Protection)

(हेही वाचा – First Anniversary of Ram Mandir : श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त PM Modi यांनी दिल्या शुभेच्छा)

नियमांनुसार, एका आयडीवर ९ सिम सक्रिय करता येतात, परंतु जम्मू-काश्मीर, आसामसह ईशान्य राज्यांच्या आयडीवर केवळ ६ सिम सक्रिय करता येतात. (SIM Card Protection)

तुमच्या आयडीवर एखादे सिम ॲक्टिव्हेट केलेले असेल जे तुम्ही वापरत नसाल तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. उदाहरणार्थ, तुमच्या आयडीसोबत नोंदणीकृत सिमसोबत चुकीच्या किंवा बेकायदेशीर हालचाली सुरू असतील, तर तुम्ही अडचणीत असाल. त्यामुळे तुमच्या आयडीवर किती सिम नोंदणीकृत आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. (SIM Card Protection)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.