जुना मोबाईल क्रमांक काही कारणास्तव बंद झाल्यावर अनेक जण ते सिम कार्डची नोंदणी रद्द करण्यास विसरतात, तसेच दुसऱ्याच्या कागदपत्रे आणि छायाचित्राचा वापर करून मोबाईल सिमची खरेदी करीत असल्याचे समोर आले आहे. जर तुमच्या कागदपत्राचा मोबाईल खरेदीसाठी वापर केला असल्यास किंवा तुमचा जुना मोबाईल क्रमांकाची नोंदणी रद्द झाली आहे का याची खात्री करण्यासाठी ‘ संचार साथी वेबसाईड’ (sanchar saathi website) या वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ1 शकता. (SIM Cards)
(हेही वाचा- Mahendra Singh Dhoni 7 Rupee Coin : महेंद्रसिंग धोनीच्या नावाने ७ रुपयांचं नाणं खरंच बाजारात येणार का?)
मुंबई सायबर पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई करून मोबाईल कंपन्यांच्या कर्मचाऱ्यासह ८ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली, या टोळीने मागील एक वर्षात ३० हजार मोबाईल सिम बेकायदेशीरित्या विक्री आणि पोर्ट करून दिले आहे. विक्री करण्यात आलेले मोबाईल सिम हे सायबर माफिया तसेच देशविरोधी कारवाया करणाऱ्याना विकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तीस हजार मोबाईल क्रमांकामध्ये अनेक मोबाईल क्रमांक दुसऱ्यांच्या नावाने रजिस्टर असून ज्यांच्या नावाने रजिस्टर आहे त्यांना माहिती देखील नाही, आणि हे मोबाईल क्रमांक त्यांनी अनेक महिने वर्षे पासून वापरत देखील नाही, परंतु या मोबाईल क्रमांक अद्यापही जुन्या वापरकर्त्याच्या नावावर रजिस्टर असून त्यांनी अधिकृतपणे मोबाईल क्रमांक बंद करण्याची विनंती मोबाईल कंपनीकडे केली नसल्यामुळे हे मोबाईल क्रमांक अद्यापही जुन्या वापरकर्त्यांच्या नावावर आहे. (SIM Cards)
ज्यांनी जुने मोबाईल क्रमांक बंद केले परंतु कंपनीकडे त्याचे रजिस्ट्रेशन (नोंदणी) रद्द केली नाही त्यांनी तात्काळ मोबाईल कंपनीला ईमेल अथवा लेखी अर्जा मार्फत कंपनीकडे मोबाईल क्रमांक रजिस्ट्रेशन रद्द करण्याची विनंती करावी. आपल्या नावावर किती मोबाईल क्रमांक रजिस्टर आहे हे तपासण्यासाठी ‘संचार साथी वेबसाईड’ (sanchar saathi website) या वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता. त्या साठी तुम्हाला संचार साथी वेबसाईडवर जाऊन ‘know your mobile connection’ वर क्लिक करावे, त्यानंतर तुम्ही सध्यस्थीतीत वापरत असलेला मोबाईल क्रमांक टाकून captcha (कॅपचा) टाकावा, तुमच्या मोबाईल क्रमांक वर एक ‘ओटीपी’येईल तो OTP टाकल्यानंतर तुमच्या नावावर किती मोबाईल क्रमांक रजिस्टर आहे याची माहिती मिळेल. (SIM Cards)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community