राज्यात कोरोना महामारीच्या काळात सुरू झालेल्या स्वस्त भोजन पुरवठा करणाऱ्या ‘शिवभोजन थाळी’ (ShivBhojan Thali) योजनेवर राज्य सरकारने गेल्या नऊ महिन्यात १५० कोटी रुपये खर्च केला असून पुढील तीन महिन्यात आणखी ५० कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत. या योजनेतील सर्वाधिक १५ कोटी रुपये निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नागपूर शहर भागात वितरित करण्यात येणार असल्याने ‘शिवभोजन’चे सर्वाधिक लाभार्थी हे मुख्यमंत्र्यांच्या शहरात असल्याचे स्पष्ट होते.
थाळी केवळ १० रुपयात
कोरोना महामारीच्या कालावधीत राज्य सरकारने गरीब आणि गरजू लोकांसाठी स्वस्त म्हणजे केवळ १० रुपयांत भोजन देण्याची योजना सुरू केली गेली. यामध्ये शहर भागातील भोजनालयात ठेकेदार एका थाळीमागे ५० रुपये तर ग्रामीण भागातील ठेकेदार एका थाळीमागे ३५ रुपये घेत आहे. गरिबांकडून १० रुपये शुल्क आकारून उर्वरित रक्कम शासनाकडून ठेकेदाराला देण्यात येतात.
(हेही वाचा – Mahakumbh : विमान बुकिंगमध्ये १६२ टक्के तर हॉटेल व्यवसायात ३ पटीने वाढ; ४ लाख कोटींची अंदाजित उलाढाल)
१५० कोटी खर्च झाले
कोरोनाच्या थोड्या कालावधीकरिता फक्त पाच रुपयांतही भोजन पुरवण्यात आले होते. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही महायुती सरकारकडून ही योजना कायम ठेवण्यात आली. दरवर्षी या योजनेसाठी ठराविक रकमेची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येते. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २६७ कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यातील १४९ कोटी रुपये नोव्हेंबर २०२४ पर्यन्त वितरित आणि खर्च झाली असून पुढीक तीन महिन्यांसाठी ५० कोटी रुपये वितरित करण्यात येतील. याबाबतचा शासन आदेश अन्न व नागरी पुरवठा खात्याने काढला आहे.
नागपूरपाठोपाठ नाशिक, ठाणे, सांगली
शिवभोजन थाळीसाठी (ShivBhojan Thali) सर्वाधिक १५.१६ कोटी निधी हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नागपूर (Nagpur) शहरात वितरित करण्यात आला आहे. तर त्या खालोखाल नाशिक भागात १४.१४ कोटी रुपये, तिसऱ्या क्रमांकावर ठाणे ९.८८ कोटी रुपये तसेच सांगलीमध्ये ९.६८ कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. एप्रिल ते जुलै २०२४ या चार महिन्यासाठी ८८.२६ कोटी रुपये वितरित करण्यात आले तर त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीसाठी ६१.५२ कोटी रुपये तर नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ साठी ५०.८२ कोटी रुपये वितरितकार्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community