Sindhudurgमधील समुद्रात नौदलाची निवृत्त युद्धनौका बुडविण्याची महत्त्वाकांक्षी योजना, कारण काय? वाचा सविस्तर…

याच अनुषंगाने युरोप आणि अमेरिकेत ज्याप्रमाणे निवृत्त युद्धनौका स्कुबा डायव्हिंगद्वारे पर्यटनासाठी समुद्राच्या पाण्याखाली बुडविल्या जातात.

118
Sindhudurgमधील समुद्रात नौदलाची निवृत्त युद्धनौका बुडविण्याची महत्त्वाकांक्षी योजना, कारण काय? वाचा सविस्तर...

सिंधुदुर्गमधील (Sindhudurg) पर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा, याकडे शासन लक्ष देत आहे. सिंधुदुर्गच्या समुद्रात नौदलाची निवृत्त युद्धनौका बुडविण्याची महत्त्वाकांक्षी योजना तयार करण्यात आली आहे. पाण्याखालील युद्धनौका प्रमाणित स्कुबा डायव्हर्सच्या माध्यमातून पर्यटकांना पाहता येणार आहे. जागतिक पर्यटन संकल्पनेच्या धर्तीवर हा भारतातील पहिलाच प्रयत्न असून समस्त सिंधुदुर्गवासीयांसाठी ही अभिमानाची बाब ठरणार आहे.

सिंधुदुर्गात सुरुवातीला स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून पर्यटनाला सुरुवात झाली, मात्र हे स्कुबा डायविंग आंतरराष्ट्रीय दर्जाचे नव्हते. भविष्याकडे पाहता सिंधुदुर्गात पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि रोजगार वाढीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा एखादा पर्यटन प्रकल्प साकारणे गरजेचे होते.

(हेही वाचा – Malshej Ghat Skywalk: माळशेजच्या सौंदर्यात भर पडणार; अर्थसंकल्पात मिळाली मंजुरी )

पाण्याखालील नाविन्यपूर्ण आकर्षण
याच अनुषंगाने युरोप आणि अमेरिकेत ज्याप्रमाणे निवृत्त युद्धनौका स्कुबा डायव्हिंगद्वारे पर्यटनासाठी समुद्राच्या पाण्याखाली बुडविल्या जातात. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाण्याखालील एक नाविन्यपूर्ण आकर्षण निर्माण व्हावे आणि ते दर्जेदार स्कुबा डायव्हर्सच्या मदतीने पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध व्हावे, असे शासनाच्या विचाराधीन होते. यावर मागील काही महिन्यात अनेक पातळ्यांवर काम सुरू होते.

एमटीडीसीच्या प्रस्तावाला नौदलाकडून मान्यता…
– महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने भारतीय नौदलाकडे पर्यटनासाठी निवृत्त युद्धनौकेची मागणी केली होती.
– निवृत्त झालेल्या युद्धनौका भंगारात पाठविण्यातची पद्धती आहे, मात्र यामुळे त्या युद्धनौकेचा गौरवशाली इतिहास नष्ट होत असतो.
– समुद्रात स्कुबा डायव्हिंगसाठी कृत्रिम प्रवाळ क्षेत्र निर्माण व्हावे म्हणून परदेशात निवृत्त युद्धनौका समुद्रात बुडवल्या जातात.
– पाण्यात बुडविलेल्या या युद्ध नौकांवर समुद्रातील कवचधारी जीवांचे थर साठतात.

इतिहास जपला जातो…
– अशा युद्ध नौका शेकडो वर्षे पाण्याखाली टिकून राहतात आणि त्यांचा इतिहास जपला जातो. तारकर्ली येथे संपन्न झालेल्या नौदल दिनाच्या वेळी नौदल अधिकाऱ्यांना ही संकल्पना समजावून सांगण्यात आली होती. ही संकल्पना ऐकल्यानंतर नौदल अधिकारी प्रभावित झाले होते.

सिंधुदुर्गवासीयांचे स्वप्न साकार होणार याचा आनंद
२००५ साली आयएनएस विराट ही निवृत्त युद्धनौका पर्यटनासाठी सिंधुदुर्गच्या समुद्रात बुडण्याची योजना पूर्ण होऊ शकली नाही, मात्र शासनाच्या या नव्या प्रकल्पामुळे जिल्ह्याचे पर्यटन आणि सागरी जैवविविधता वाढीस लागणार आहे. जिल्ह्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष १० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. यामुळे दरवर्षी १०० के १५० कोटींच्या अर्थव्यवस्थेत वाढ होणार आहे. असा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यास पुढाकार घेतल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण जेष्ठ नेते, खासदार नारायण राणे, मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचलनालयाच्या श्रद्धा जोशी शर्मा, डॉ. बी. एन. पाटील तसेच इसदाच्या संपूर्ण टीमचे सहकारी यांचे सहकार्य लाभले. या उपलब्धीबद्दल सिंधुदुर्गवासीयांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्गाच्या सागरी पर्यटनाचे जनक असलेल्या डॉ. सारंग कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.