सिंधुदुर्गात जिल्हाबंदी! या सीमा राहणार बंद

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून या सर्व सीमा पूर्णतः बंद करण्यात आल्या आहेत.

राज्यात सर्वात जास्त कोरोना रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून, राज्याचा सरासरी रुग्णसंख्या दर ०.४७ टक्के असताना, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रुग्णसंख्या दर २.०१ टक्के आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सध्या रेड झोन मध्ये असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वाधिक ३१.३६ टक्के इतका होता. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात सीमा बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सीमा बंद

त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन मध्ये दाखल झाला असून, जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने खारेपाटण, करुळ, आंबोली, गोवा जिल्ह्यातील सीमा मंगळवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जिल्ह्या बाहेरुन किंवा परराज्यातून येणाऱ्या व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश दिला जात होता. मात्र वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून या सर्व सीमा पूर्णतः बंद करण्यात आल्या आहेत. एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर किंवा आजारी असल्यास जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे.

निर्णय संपूर्ण जिल्ह्यात लागू 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने वारंवार देऊनही लोक ते गंभीरतेने घेताना दिसत नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जनतेला
दिलेली सूट, लोकांच्या बेशिस्तीच्या वागण्याने समाजासाठी प्राणघातक ठरू नये, यासाठी पोलिस यंत्रणा झगडत आहेत. वैद्यकीय यंत्रणा जीवावर उदार होऊन रात्रंदिवस सेवा करण्यात गर्क आहेत. त्यामुळए हे निर्बंध 15 जूनपर्यंत संपूर्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here