पन्हाळ्या, विशाळगडानंतर आता विजयदुर्ग किल्ला ढासळतोय 

141

शिवकालीन इतिहासाचे जीवंत साक्षीदार असलेल्या या वास्तू नामशेष होत आहेत. यंदाच्या पावसात आधी पन्हाळगडाचे बुरुज ढासळले होते, त्यानंतर विशाळगडाचा बुरुज ढासळला आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याचे बुरुज ढासळू लागले आहेत. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारच्या समोर या गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

किल्ल्याची तटबंदी ढासळण्याचे प्रकार वारंवार घडतात 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या देवगडमधील विजयदुर्ग किल्ल्याची गेले काही वर्षे बुरुज ढासळत आहेत. 14 ऑगस्ट रोजी विजयदुर्ग किल्ल्याचा दर्या बुरुजाच्या समुद्राकडील खालील बाजूची तटबंदी सतत होणाऱ्या लाटांच्या मारांमुळे ढासळली आहे. विजयुदर्ग किल्ल्याची तटबंदी ढासळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातच त्याकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

(हेही वाचा ईडीच्या तीन ठिकाणी धाडी, संजय राऊतांच्या अडचणीत वाढ)

विजयुदुर्ग किल्ला हा एक एैतिहासिक किल्ला   

विजयदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम बाजूला म्हणजेच समुद्राकडील बाजूला दर्या बुरुज तटबंदी 14 ऑगस्टला समुद्राच्या लाटांमुळे ढासळली. ही ढासळलेली तटबंदी मच्छीमारांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. त्यामुळे तटबंदी ढासळली हे समोर आले. तटबंदीचा काहीसा भाग खालून कोसळला असून समुद्राच्या लाटांमुळे भविष्यात संपूर्ण तटबंदी ढासळण्याचा धोका उदभवू शकतो. विजयुदुर्ग किल्ला हा एक एैतिहासिक किल्ला असून या किल्ल्यावरती दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र सतत होणारी पडझड पाहता भविष्यात या किल्ल्याचे नाव असेल. मात्र प्रत्यक्षात किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भीती किल्ल्याप्रेमींनी व्यक्त करत आहेत. दोन वर्षापुर्वी विजयदुर्ग किल्ल्याच्या तुटक्या बुरजा जवळील तटबंदी ढासळलेली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.