सिंधुदुर्गातील वेंगुर्ले बंदरात (Sindhudurga Boat Accident) जाणरी एक बोट पलटल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण बेपत्ता आहेत. बेपत्तांचा शोध सुरू आहे. राज्यात गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक बोट पलटल्याची घटना समोर येत आहे. (Sindhudurga Boat Accident)
शोध मोहीम सुरु
वेंगुर्ले बंदरात रात्री मच्छिमार बोटींना लागणार बर्फ घेऊन बोट घऊन जात असताना बोट उलटली. या बोटीमध्ये एकूण सात खलाशी होते. बोट पलटी झाल्यानंतर तीन जणांनी पोहून किनारा गाठला. तर चार जण बेपत्ता होते. त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून दोघे जण अद्याप बेपत्ता आहेत, शोध मोहीम सुरु आहे. (Sindhudurga Boat Accident)
बोट भरकटल्याने हा प्रकार घडला…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurga Boat Accident) वेंगुर्ला बंदरातून रात्री मच्छिमारांना लागणारा बर्फाची वाहतूक सुरू असताना ही दुर्घटना घडला. रात्री ढगांचा गडगडाट जोरदार वादळी वारे अशी परिस्थिती असल्यामुळे ही बोट भरकटल्याने हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता असलेल्या खलाशांपैकी एक खलाशी रत्नागिरीतील तर तीन खलाशी मध्यप्रदेशातील असल्याचे समजते. अन्य होड्यांमधून त्या खलाशांना वाचविण्यासाठी शोध कार्य सुरू झाले आहे. (Sindhudurga Boat Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community