बॅंकेसंदर्भात कोणत्याही तक्रारी असल्या तर ग्राहक संबंधित बॅंकेच्या संपर्क क्रमांकावर तक्रार करावी लागते. या हेल्पलाईन क्रमांकाद्वारे ग्राहकांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत अशा तक्रारी सुद्धा अनेकांनी केल्या होत्या. त्यामुळेच आता सर्व सरकारी बॅंकासाठी एकच हेल्पलाईन क्रमांक असणार आहे. केंद्र सरकारने सर्व सरकारी बॅंकांना एकच हेल्पलाईन सुरू करण्यास सांगितले आहे.
( हेही वाचा : पंतप्रधानांची तरुणांना दिवाळी भेट; 75 हजार नवनियुक्तीपत्रे कर्मचा-यांना केली सुपूर्द )
सर्व सरकारी बॅंकांसाठी एकच हेल्पलाईन क्रमांक
सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बॅंकांना ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एकच राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू करण्यास सांगितले आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर ग्राहक कोणत्याही बॅंकेची तक्रार नोंदवू शकणार आहेत. हा क्रमांक ३ ते ४ अंकी असणार आहे.
कामकाजावर देखरेख करण्यासाठी समिती नियुक्त करणार
बॅंकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण होत नाही त्यामुळेच सरकारने बॅंकांना एकच क्रमांक उपलब्ध करण्यास सांगितले आहे. सर्व बॅंकांची माहिती एकाच हेल्पलाईनद्वारे मिळेल. याशिवाय ग्राहक या क्रमांकाद्वारे आपल्या बॅंकेविषयक समस्या सुद्धा सोडवू शकतात. या कामकाजावर देखरेख करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community