राज्य सरकारने सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर घातलेली बंदी उठवली आहे. प्लास्टिकच्या 60 जीएसएमपेक्षा अधिक जाडीच्या पिशव्या, पेपर कप, द्रोण, पत्रावळी, स्ट्राॅ, चमचे, काटे यांच्या वापरण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मार्च 2018 पासून या वस्तूंच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्यात आली होती. बंदी शिथिल करण्याबाबतची अधिसूचना राज्य सरकारकडून गुरुवारी जारी करण्यात आली आहे.
राज्याच्या पर्यावरण व वातारवणीय बदल विभागाने 23 मार्च 2018 रोजी सिंगल यूज प्लास्टिकसह प्लास्टिक पॅकिंगवरही बंदी घातली होती. त्यानंतर ही अट शिथिलही करण्यात आली होती. रामदास कदम पर्यावरण मंत्री असताना, बंदी राज्यभर लागू करण्यात आली. प्लास्टिक उत्पादन करणा-या कंपन्यांवर धाडी टाकण्यात आल्या. केंद्र सरकारनेही 1 जुलै रोजी सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आदेश जारी केला.
( हेही वाचा: नागपूर पोलिसांना आता भटक्या श्वानांवर नजर ठेवून करावी लागणार गणना )
….म्हणून उठवली बंदी
- बंदीमुळे छोट्या प्रमाणावर काम करणा-या सहा लाखांहून अधिक युवक व महिलांवर बेरोजगारी कु-हाड कोसळल्याने ही बंदी उठवावी अशी मागणी लघू उद्योजकांकडून करण्यात येत होती. महाराष्ट्र चेंबूर ऑफ काॅमर्स, तसेच लघू उद्योजकांच्या संघटनांकडून ही बंदी उठवण्याची मागणी केली.
- महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सकडूनही 31 जुलै रोजी संभाजीनगर येथील राज्यस्तरीय परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर यासंदर्भात अडचणी मांडण्यात आल्या होत्या.