मुंबईत सध्या १०वी आणि १२वी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी कसलाही अडथळा येऊ नये यासाठी मुंबईतील सायन पूल (Sion Bridge) पाडण्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. परंतू या सायन पुलाची (Sion Bridge) अवस्था अत्यंत धोकादायक बनत चालली आहे. विविध माध्यमांतून या धोकादायक पुलाविषयी सांगण्यात येत असूनही प्रवासी आपला जीव धोक्यात घालून या पुलावरुन प्रवास करीत आहेत. सायन पूल २७ फेब्रुवारीला पाडण्यात येणार होता. पण, १०वी आणि १२वीच्या परीक्षा संपेपर्यंत सायन पूल (Sion Bridge) पाडकामाला २६ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. (Sion Bridge)
या पुलावरून (Sion Bridge) रोज हजारोंच्या संख्येने जड आणि हलकी वाहने दळणवळण करीत असतात. जर कधी एखादा अपघात झाल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. राहूल शेवाळेंनी संसदेत उपस्थित केलेल्या चिंतेच्या कारणामुळे पूल पाडकाम २० जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आले होते. जर या मुद्याला गांभिर्याने घेतले नाही तर हिमालय पूल दुर्घटना मुंबईत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशातच प्रवाशांनी या धोकादायक पुलाचा प्रवासासाठी वापर करणे टाळायला हवे. (Sion Bridge)
(हेही वाचा – Supreme Court : ‘नोट के बदल वोट’ आणि ‘नोट के बदल भाषण’ म्हणणारे आमदार, खासदारावर चालणार खटला)
२०१८ मध्ये गोखले पूल दुर्घटनेनंतर रेल्वे, मुंबई महानगरपालिका आणि आयआयटी बॉम्बेने मुंबईतील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. तेव्हा धोकादायक पुलांच्या बदल्यात ब्रिटीश कालिन सगळ्या पुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात सायन पुलाचाही समावेश आहे. या पुलाची पुनर्बांधणी दोन वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष ठेवले गेले होते. (Sion Bridge)
२०२० मध्ये धोकादायक पूल म्हणून घोषित
बॉम्बे आयआयटीने २०२० मध्ये हा पूल धोकादायक म्हणून घोषित केले. या अहवालात उल्लेख केल्याप्रमाणे, पहिले दोन आय-गर्डर, RCC डेक स्लॅब आणि उत्तर बाजूकडील RCC पॅरापेट भिंत जीर्ण झाली आहेत आणि तीन महिन्यांत त्यांची दुरुस्ती किंवा पुनर्वसन करण्यात यावे. सीआरने काही काळ दुरुस्तीचे काम सुरू ठेवले आणि अखेरीस खाली नवीन ट्रॅक टाकण्यासाठी विकास कामाचा भाग म्हणून पूल पाडण्याचा निर्णय घेतला. मध्य रेल्वेने काही दिवस दुरुस्ती किंवा पुनर्वसन करण्याचे काम सुरु ठेवले आणि शेवटी खाली नवीन रुळ टाकण्याच्या विकास कामाचे कार्याचा एक भाग म्हणून पुलाला पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतू अजूनही या पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. या पुलाचे बांधकाम १९१२ मध्ये पूर्ण आले. १९१२ मध्ये बांधलेला सायन पूल (Sion Bridge) धारावी, एलबीएस रोड आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो. तो बंद केल्याने इतर पूर्व-पश्चिम कनेक्टरवर गर्दी होऊ शकते. (Sion Bridge)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community