Ice-cream : ह्रदयाला चटका लावणारी कथा; आईचा जीव वाचवण्यासाठी बहिण-भाऊ विकतात आईसक्रीम

पहिल्या दिवशी ३०० पेक्षा अधिक आईसक्रीम त्यांनी विकले.

213
आईचा जीव वाचवण्याची बहिण-भाऊ विकतात आईसक्रीम
आईचा जीव वाचवण्याची बहिण-भाऊ विकतात आईसक्रीम

एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी अशी ही सत्य घटना आहे. आई आजारी असताना बूट पॉलिश किंवा इतर कामे करुन पैसे कमावणारी लहान मुले तुम्ही बॉलिवूड चित्रपटांत पाहिली असतील. मात्र आता अशी घटना खरोखर घडली आहे. दक्षिण चीन मॉर्रिंग पोस्टने याबाबतीत बातमी दिली आहे.

चीनमधील हेनान प्रांतात हा प्रकार घडला आहे. एक लहान मुलगी आणि तिचा लहान भाऊ हेनान प्रांतात राहतात आणि आपल्या घरापासून सुमारे ३ किमी सायकलवरुन प्रवास करत गेले आणि तिथे त्यांनी तीन दिवसांत एक हजार आईस्क्रीमची विक्री केली. याबद्दल कारण जाणून घेतल्यावर कळलं की त्यांची आई रुग्णालयात दाखल झाली होती.

(हेही वाचा Maharashtra Political crisis : अपात्रतेची टांगती तलवार; एकनाथ शिंदेंसह कोण आहेत ‘ते’ १६ आमदार?)

या लहान मुलांची आई आईस लॉली आणि आईसस्क्रीम विकते. तिला लहानपणीच पोलिओ झाला होता. तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मग आपल्या आईला मदत करण्यासाठी मुलांची तिचा व्यवसाय सांभाळण्याचा निश्चय केला.

पहिल्या दिवशी ३०० पेक्षा अधिक आईसक्रीम त्यांनी विकले. आणि मग दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी मिळून १००० चा टप्पा पार केला. मुळातच गरीब असलेलं हे कुटुंब किती स्वावलंबी आहे आणि महत्वाचं म्हणजे लहान मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव आहे. असा मुलांमध्ये काहीतरी करुन दाखवण्याची धमक असते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.