Sitapur मध्ये शब्बीरने साथीदारांसह केला हिंदू महिलेवर अत्याचार

87
Sitapur मध्ये शब्बीरने साथीदारांसह केला हिंदू महिलेवर अत्याचार
Sitapur मध्ये शब्बीरने साथीदारांसह केला हिंदू महिलेवर अत्याचार

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सीतापूर (Sitapur) जिल्ह्यातील मानपूर पोलिस ठाण्यात (Manpur Police Station) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी धर्मांध तीन मुस्लिम तरुणांनी एका विधवा हिंदू (Hindu) महिलेला वासनेचे शिकार बनवले आहे. पीडित महिलेची प्रकृची चिंताजनक असून तिला सीतापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ( Sitapur)

1( हेही वाचा : Mumbai International Airport वर ९ कोटींचे सोने आणि हिरे जप्त

घटना कशी घडली..?

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मानपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला. आरोपींची ओळख पटली असून शब्बीर (Shabbir), शरीफ (Sharif) आणि मोबिन अशी आरोपींची नावे आहेत. या तीन आरोपींनी मिळून पीडित महिलेवर अत्याचार केले. आरोपींनी पीडितेवर अत्याचार करून घटना स्थळावरून पळ काढला.

पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक

पीडितेवर अत्याचार झाल्याची माहिती मिळताच स्थानिक लोक घटनास्थळी पोहचले आणि पोलिसांनाही माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी पीडितेला ताबडतोब सीएससी मानपूर रुग्णालयात नेले, परंतु तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. पीडितेवर सीतापूर जिल्हा रुग्णालयात उपाचार सुरु आहे.

पोलिसांनी काय म्हटले..?

अतिरिक्त पोलिस अधीक्षक उत्तरी प्रकाश कुमार (Uatari Prakash Kumar) यांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना अटक करण्यासाठी छापे टाकण्यात आले आहेत. त्यांनी आश्वासन दिले की आरोपींना लवकरच तुरुंगात टाकले जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल. (Sitapur)

योगी सरकारची कडक भूमिका

उत्तर प्रदेशात, योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकार महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी सतत कठोर पावले उचलत आहे. अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात महिला सुरक्षेबाबत कडक सूचना दिल्या होत्या. दरम्यान सीतापूर (Sitapur) जिल्ह्यातील घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे आणि स्थानिक हिंदू (Hindu) संघटनांनी आरोपींना तात्काळ अटक करून जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी केली आहे. लोकांनी सीतापूर पोलिसांना आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

हेही पाहा :

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.