परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पाकिस्तान, कॅनडासारख्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर आपले मत उघडपणे व्यक्त केले. (Khalistani Terrorists In Canada)
(हेही वाचा – Truck-Tanker Drivers Strike: मुंबईतील २१० पेट्रोल पंप रात्रीपर्यंत बंद पडणार? अन्याय करणारे धोरण तातडीने मागे घेण्याची मागणी)
भारत आणि कॅनडा (Canada) यांच्यातील सध्याच्या राजनैतिक संबंधांबाबत परराष्ट्र व्यवहारमंत्री (Minister of External Affairs) म्हणाले की, कॅनडाच्या राजकारणाने खलिस्तानी दहशतवाद्यांना (Khalistani terrorists) आश्रय दिला आहे. ते लोक कॅनडाच्या राजकारणात थेट सहभागी आहेत आणि मला वाटते की, म्हणूनच दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. ही परिस्थिती दोन्ही देशांसाठी (भारत आणि कॅनडा) धोकादायक आहे, हा भारतासाठी जितका धोका आहे, तितकेच कॅनडासाठीही नुकसानकारक आहे, असे मला वाटते.
पाकिस्तानचे मुख्य धोरण दहशतवाद
याच मुलाखतीत पाकिस्तानविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, पाकिस्तान (Pakistan) अनेक दशकांपासून भारतात दहशतवाद (Terrorism) पसरवत आहे. तसेच भारताला वाटाघाटीच्या टेबलवर आणण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचे मुख्य धोरण दहशतवाद आहे. आता आम्ही तो खेळ खेळणे बंद केले आहे. शेवटी एक शेजारी दुसऱ्या शेजाऱ्यासाठी उपयुक्त ठरतो. असे नाही की, आपण आपल्या शेजाऱ्याशी बोलणार नाही. त्यांनी (पाकिस्तानने) ठरवलेल्या अटींच्या आधारे आम्ही वाटाघाटी करणार नाही. (Khalistani Terrorists In Canada)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community