डासांना मारणाऱ्या मॉस्किटो क्वॉईलमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री दिल्ली येथे घडल्याचे समोर आले आहे. स्थानिक शास्त्री पार्क परिसरात हा प्रकार घडला असून याबाबत शुक्रवारी सकाळी माहिती मिळाल्याचे ईशान्य दिल्लीच्या पोलिस उपायुक्तांनी सांगितले.
यासंदर्भातील माहितीनुसार, दिल्लीच्या शास्त्रीपार्क परिसरात गुरुवारी रात्री डासांपासून बचावासाठी मॉस्किटो क्वॉईल लावून एक कुटुंब झोपी गेले. त्यानंतर मॉस्किटो क्वॉईलची ठिणगी पडून उशीला आग लागली त्यात भाजून २ जणांचा मृत्यू झाला. तर यावेळी झालेल्या धुरात मॉस्किटो क्वॉईलमधून निघणारा कार्बन मोनॉक्साईड त्यात मिसळल्यामुळे ४ जणांचा गुदमरून मृत्यू झाला.
या घटनेबाबत आशुक्रवारी सकाळी माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सर्वांना तत्काळ नजीकच्या चंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी ६ लोकांना मृत घोषित केले. दरम्यान २ लोकांवर उपचार सुरू असून २२ वर्षीय जखमी तरुणावर प्राथमिक उपचार करून त्याला डिस्चार्ज करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये ४ पुरुष, एक महिला व एका लहान मुलाचा समावेश आहे. मृत बालकाचे वय दीड वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचा – Indore Temple Accident: इंदूर दुर्घटनेतील मृत्यूची संख्या ३५वर, १८ जण जखमी)
Join Our WhatsApp Community