देशातील ६ व्याघ्र प्रकल्पांना जागतिक मानकाचा दर्जा; राज्यातील ‘या’ अभयारण्यांचा समावेश

64

कंझर्व्हेशन ॲश्युअर्ड टायगर स्टँडर्ड्स (सीए/टीएस) या सर्वोच्च जागतिक व्याघ्र मानक संस्थेने वाघांच्या संवर्धनासाठी देशभरातील 6 व्याघ्र प्रकल्पांना जागतिक मानकाचा दर्जा बहाल केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे.

( हेही वाचा  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ‘धनुष्यबाण यात्रा’! छत्रपती संभाजीनगरमधून होणार सुरूवात )

देशातील 6 व्याघ्र प्रकल्पांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प (महाराष्ट्र), पेरियार राष्ट्रीय उद्यान (केरळ), काली टायगर रिझर्व्ह (कर्नाटक), पिलीभीत व्याघ्र प्रकल्प (उत्तरप्रदेश), ताडोबा-अंधारी आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प (महाराष्ट्र) यांचा समावेश आहे.

मेळघाट अभयारण्याची 50 व्या वर्षाकडे वाटचाल

स्वित्झरलॅंड येथील सीए/ टीएस या आंतरराष्ट्रीय संस्थेने वाघांच्या संरक्षणाबाबत 6 व्याघ्र प्रकल्पांना जागतिक मानकाचा दर्जा बहाल केल्याबाबतचे पत्र केंद्रीय वने, पर्यावरण मंत्रालयाने 24 मार्च 2023 रोजी जारी केले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मिळालेले हे मानक मोठी कामगिरी मानली जात आहे.

पंतप्रधानांना आमंत्रण 

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यांतर्गत येत असल्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची 50 व्या वर्षाकडे वाटचाल सुरू झाली असून, त्याचा जागतिक स्तरावर समावेश होणे ही अत्यंत गौरवाची बाब आहे. विशेषत: या व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांना निमंत्रण दिले जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.