आदिवासी भागाच्या विकासाकरीता कौशल्य शिक्षण महत्वाचे ; मंत्री Nitin Gadkari यांचे विधान

32
आदिवासी भागाच्या विकासाकरीता कौशल्य शिक्षण महत्वाचे ; मंत्री Nitin Gadkari यांचे विधान
आदिवासी भागाच्या विकासाकरीता कौशल्य शिक्षण महत्वाचे ; मंत्री Nitin Gadkari यांचे विधान

आदिवासी भागातील (tribal areas) लोकांना समाजाच्या प्रवाहासोबत आणण्यासाठी मोठया प्रमाणात कौशल्य शिक्षण महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (Nagpur) यांच्या संयुक्त विद्यमाने ’एम्स’ नागपूर येथे आयोजित MUHS FIST-25 परिषदेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले. (Nitin Gadkari)

हेही वाचा-NASA ने पृथ्वीसाठी दिला धोक्याचा इशारा; काय आहे कारण ?

यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत ’एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, MUHS FIST-25 परिषदेचे आयोजक डॉ. संजीव चौधरी उपस्थित होते. (Nitin Gadkari)

हेही वाचा-हवाई प्रवाशांना मिळणार दिलासा; Pune Airport वरील ‘डिजियात्रा’ लवकरच होणार सुरू

यावेळी मार्गदर्शन करतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, “आदिवासी भागात पायाभूत सुविधा पोहचणे गरजेचे आहे, त्यासाठी कौशल्य शिक्षण, पारंपरिक उद्योगांना प्राधान्य, आरोग्य व आर्थिकदृष्टया सक्षम करणे गरजेचे आहे. बांबूपासून विविध वस्तु तयार करुन जागतिक बाजारपेठेत त्याची मागणी वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. बांबूपासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प आदिवासी भागात सुरु करण्यात येणार असून त्याद्वारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल तसेच कच्चा मालाचा पुरवठा करण्यासाठी वाहतुकीवरील खर्चही कमी लागेल.” (Nitin Gadkari)

हेही वाचा-IND vs SA U19 Women’s T20 WC : भारताच्या पोरी ‘लय भारी’!​ भारत सलग दुसऱ्यांदा अंडर-19 महिला टी-20 विश्वविजेता

“सामाजिक आणि आर्थिक बाबींचे संतुलन साभांळत आदिवासींना आवश्यक पायाभूत गोष्टी पुरविण्यसाठी सर्वांनी प्रयन्तशील राहावे. पर्यावरण संवर्धनाची गरज महत्वपूर्ण असून पर्यायी इंधन शोधणे आवश्यक आहे. बायोडिझेल ऐवजी सी.एन.जी., इथेनॉल, हायड्रोजन इंधनावर भर देणे गरजेचे आहे. बांबूपासूनही बायो-इथेनॉल प्रकारात इंधन निर्मिती करता येत, या गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे आहे. बांबूपासून फर्निचर निर्मिती करुन कला व उद्योगाचा प्राधान्य देता येईल.” असे गडकरी यांनी सांगितले. (Nitin Gadkari)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.