उल्हासनगरमधील ५ मजली इमारतीचे सगळे स्लॅब कोसळले! ७ जणांचा मृत्यू!

या इमारतीत एकूण २९ फ्लॅट्स आहेत. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शुक्रवार, २८ मे रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास बँक ऑफ बडोदा समोर, नेहरू चौक, उल्हासनगर येथे साई सिद्धी इमारत (तळ + ५) या इमारतीमधील पाचव्या मजल्यापासून पहिल्या मजल्यापर्यंतचा स्लॅब तळ मजल्यावर कोसळला. या अपघातात ७ जणांचा मृत्यू तर १ जण जखमी आहे. घटनास्थळी उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान व पोलिस कर्मचारी, रुग्णवाहिकेसह उपस्थित राहिले असून  इमारतीमध्ये अडकलेल्यांना सुरक्षितपणे काढण्यासाठी बचावकार्य सुरु झाले आहे.

इमारतीत एकूण २९ फ्लॅट्स

या इमारतीत एकूण २९ फ्लॅट्स आहेत. त्यामुळे येथील ढिगाऱ्याखाली किती जण अडकले आहेत, हे नेमके सांगता येत नाही, मात्र अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठाणे महापालिकेची टीडीआरएफ टीम घटनास्थळी रवाना झाली. जखमी व्यक्तीला मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा : बिल्डर युसूफ लकडावालाला ईडीने केली अटक!)

जखमी व्यक्तीचे नावे 

अलगोत नायडर ( पु/ वय ६० वर्ष)

मृत व्यक्तींची नावे 

  • पुनीत बजोमल चांदवाणी (पु/वय १७ वर्ष)
  • दिनेश बजोमल चांदवाणी (पु/वय ४० वर्ष)
  • दीपक बजोमल चांदवाणी (पु/वय ४२ वर्ष)
  • मोहिनी बजोमल चांदवाणी (स्त्री /वय ६५ वर्ष)
  • कृष्णा इनूचंद बजाज (पु/वय २४ वर्ष)
  • अमृता इनूचंद बजाज (स्त्री /वय ५४ वर्ष)
  • लवली बजाज

काही दिवसांपूर्वीही असाच झालेला अपघात

यापूर्वी १५ मे रोजी उल्हासनगरमधील निवासी इमारतीचा भाग कोसळला होता. ज्यात ४ जण ठार झाले होते. या अपघातात ११ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. या इमारतीत ९ फ्लॅट आणि ८ दुकाने होती. या दुःखद घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती. या अपघातानंतर महासंचालक डॉ. राजा दयानिधी यांनी सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here