‘या’ शहरांतील झोपडीधारकांना मोफत सदनिका मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा!

100

मुंबईच्या धर्तीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टीधारकांना २६९ चौरस फूट (२५ चौरस मीटर) ऐवजी ३०० चौरस फुटांची (२७.८८ चौरस मीटर कार्पेट) सदनिका मोफत मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप सुधारित नियमावलीत ही तरतूद करण्यात आली होती. झोपडपट्टीधारकांना सदनिकांच्या क्षेत्रफळात वाढ करण्याबाबतची प्रारूप नियमावलीतील या तरतुदीबाबत स्वतंत्र आदेश काढीत राज्य सरकारकडून त्यास मान्यता देण्यात आली.

( हेही वाचा : पुणे मेट्रोचे आले वेळापत्रक, जाणून घ्या! )

मोफत मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी २००५ मध्ये राज्य सरकारकडून एसआरएची स्थापन करण्यात आली. या प्राधिकरणामार्फत २००८ मध्ये झोपडपट्टीचे पुनर्वसन प्रकल्पासाठी नियमावली तयार करण्यात आली. त्यामध्ये झोपडीधारकांना २५ चौरस मीटर क्षेत्रफळाची सदनिका मोफत देण्याची, तसेच त्यासाठी जास्तीत जास्त तीन एफएसआय वापरून बांधकामास परवानगी देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, २०१५ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने त्यामध्ये सुधारणा करीत अशा प्रकल्पांसाठी देण्यात येणाऱ्या एफएसआयमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचे काम ठप्प पडले होते. परंतु आता ३०० चौरस फुटांच्या सदनिका मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.