मुंबईत कुठे कुठे आहेत जोशीमठ?

187
पर्यावरणाचा होणारा ऱ्हास हा देशावर प्रतिकूल परिणाम घडवत आहे. त्याचा मोठा फटका उत्तराखंडमधील जोशीमठाला बसला आहे. या ठिकाणी २००० घरे असलेल्या डोंगराळ भागतील वस्त्या रिकाम्या करण्याची वेळ आली आहे. तिथे कधीही दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. मात्र आता देशभरातील अन्य राज्यांत कुठे जोशीमठ आहेत का, अशी चर्चा सुरु झाली. त्यात देशाची आर्थिक राजधानी आणि आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या मुंबई शहराची चर्चा विशेष आहे.

कुठे आहेत मुंबईत जोशीमठ? 

मुंबईतील मलबारहिल, गोरेगाव, कुर्ला, घाटकोपर, असल्फा व्हिलेज, सूर्यानगर, विक्रोळी पार्कसाइट, अॅन्टॉप हिल, चेंबूर वाशीनाका, भांडुप, मालाड आप्पापाडा, कांदिवली कुर्ल्याचा कसाईवाड्याचा डोंगर या ठिकाणच्या डोंगर उतारावर सुमारे ३५ हजार झोपड्या दरडवर वसल्या आहेत. काही कच्च्या तर काही पक्के बांधकाम केलेल्या या झोपड्यांवर कोणताही तोडगा पालिका व जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला नाही. मागील वर्षी पावसाळ्यात मुंबईतील दरडींवरील २८१ ठिकाणे धोकादायक आढळली होती. आयआयटीने केलेल्या सर्वेक्षणात अनेक झोपड्यांचे कायमस्वरुपी स्थलांतर करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र हा निर्णय अद्याप कागदावरच राहिला आहे. पावसाळा जवळ आला की पालिकेकडून या झोपड्यांच्या ठिकाणांची पाहणी केली केली जाते. धोकादायक ठिकाणावरील झोपड्यांना नोटीस बजावत झोपड्या त्वरित खाली करण्याच्या सूचना देण्यात येतात. पण कार्यवाही होत नाही. कुर्ला ‘एल’ विभागात जरीमरी, सुंदरबाग, संजय नगर, खाडी नं ३, मोहिली व्हिलेज हे सर्व डोंगराळ भाग आहेत. पावसाळ्यात प्रत्येक वेळी डोंगरावरील माती घसरून अर्थात दरड कोसळून दुर्घटना घडतेच. मागील १९ वर्षांचा इतिहास पाहिल्यास २५ पेक्षा अधिक दरड कोसळण्याचा घटना या भागांत घडल्या आहेत. त्यामुळे उत्तराखंड येथे जसे मानवनिर्मित चुकांमुळे येथील नागरीवस्त्या धोकादायक बनल्या आहेत. तसे मुंबईतील मोठा नागरीवस्त्यांचा भागही जोशीमठ बनला आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.