पंतप्रधान मुद्रा योजनेद्वारे बॅंकांकडून कर्ज घेणारे छोटे व्यापारी कर्जाच्या परतफेडीबाबत सर्वाधिक जागरुक व प्रामाणिक असल्याचे आढळून आले आहे. कोविड-19 साथीचा सर्वाधिक फटका छोट्या व्यापा-यांना बसला असतानाही त्यांनी आपल्या कर्जाची वेळेत परतफेड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच या योजनेच्या अकार्यरत भांडवलाचे प्रमाण सर्वात कमी आहे, असे उपलब्ध आकडेवारीनुसार दिसून येते.
3.3 टक्के सर्वाधिक कमी राहिला एनपीए
30 जून 2022 पर्यंत मुद्रा योजनेचा एनपीए 46 हजार 53.39 कोटी रुपये राहिला. या काळात मुद्रा योजनेत 13.46 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले. संपूर्ण बॅंकिंग क्षेत्रातील एनपीएच्या तुलनेत हा आकडा अर्धाच आहे.
( हेही वाचा: RBI ने ‘या’ बँकेवर केली मोठी कारवाई; तुमचं खात तर नाही ना? )
श्रीमंतांचा एनपीए – 5.97 टक्के
प्राप्त आकडेवारीनुसार, 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या वर्षात श्रीमंतांचा एनपीए 5.97 टक्के होता. याचाच अर्थ बॅंकांची कर्जे थकवण्यात गरीब नव्हे, तर श्रीमंत लोकच आघाडीवर आहेत.