स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणा-या सुट्ट्या भागावरील सीमा शुल्क इनपुट्सच्या आधारावर अधिक प्रमाणात आकारण्यात येणार असल्याचा आदेश केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क बोर्डाने जारी केला आहे. त्यामुळे भारतात स्मार्टफोनच्या किमती वाढणार आहेत.
बॅंक सपोर्ट फ्रेमसह स्मार्ट डिस्ल्पे असेंबलीच्या आयातीवरील आधार सीमा शुल्क 10 टक्क्यांनी वाढणार आहे. आता सुटे भाग डिस्प्ले असेंबलीसोबत आयात केल्यास आयात कर 15 टक्के होईल. आधी तो 5 टक्के होता. या पार्श्वभूमीवर मोबाईल कंपन्या फोनच्या किमतीत 10 ते 15 टक्के वाढ करु शकतात.
उद्योगाचे म्हणणे काय?
स्मार्टफोन उत्पादक उद्योगाने या करवाढीस विरोध केला आहे. उद्योगाचे म्हणणे आहे की, मोबाईल फोनच्या डिस्प्लेसोबत जोडलेल्या सर्व सुट्या भागांना एकत्रितरित्या डिस्प्ले असेंबली मानले जायला हवे. त्यानुसार, त्यावर केवळ 10 टक्के आयात कर लागायला हवा.
( हेही वाचा: शिवसेनेची संभाजी ब्रिगेड सोबत युती, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घोषणा )
विक्रीत आधीच घट
चीपच्या टंचाईमुळे रेडमी, ओप्पो, सॅमसंग यांसह अनेक प्रमुख मोबाईल फोन कंपन्यांनी फोनच्या किंमती अलीकडेच वाढवल्या आहेत. सरासरी 1 हजार 500 रुपयांची दरवाढ कंपन्यांनी केली आहे. त्याचा बाजारावर परिणाम झाला आहे. 2022 च्या एप्रिल- जूनच्या तिमाहीत भारतात स्मार्टफोनची विक्री 9 टक्क्यांनी वाढली. मात्र, विक्री 5 टक्क्यांनी घसरुन, 3.7 कोटी युनिट राहिली.
Join Our WhatsApp Community