धावत्या रेल्वेच्या डब्यांमधून धूर! नांदेड-कुर्ला हॉलिडे एक्स्प्रेसमधील प्रकार

197

नांदेड-कुर्ला हॉलिडे एक्सप्रेस (गाडी क्रमांक 07428) रेल्वे गाडीच्या दोन डब्यांच्या खालून अचानक मोठ्या प्रमाणात धूर निघू लागल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. भुगाव तालुक्यातील निफाड रेल्वे स्थानकात ही गाडी साखळी ओढून थांबवण्यात आली. गाडीच्या चाकाला प्लास्टिकचा ब्रेक चिटकल्याने धूर निघत असल्याचे लक्षात आल्यावर ब्रेक दुरुस्त करत गाडी मनमाडच्या दिशेने रवाना झाली. यावेळी मनमाड-मुंबई गोदावरी एक्सप्रेस उगाव रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली.

( हेही वाचा : हक्कभंग: संजय राऊतांना सात दिवसांत लेखी उत्तर द्यावे लागणार )

गुरुवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास नांदेड-कुर्ला हॉलिडे स्पेशल ही गाडी नाशिकसाठी मार्गस्थ झाली, लासलगाव रेल्वे स्थानकातून ही गाडी निघाल्यानंतर या गाडीच्या इंजिनापासून पाचव्या आणि सहाव्या ( एस-3 आणि एस-4 ) डब्यांच्या खालून धूर निघू लागला. सुरुवातीला प्रवाशांना डिझेल इंजिनचा दूर असावा असे वाटल्याने प्रवाशांनी दुर्लक्ष केले पण नंतर अधिक प्रमाणात धूर येऊ लागल्याने त्यानंतर प्रवाशांनी तात्काळ गाडीची साखळी ओढली.

गाडीच्या चालकाला इशारा मिळाल्यानंतर त्याने तात्काळ उगाव रेल्वे स्थानकात ही गाडी थांबवली, धूर निघू लागल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी या दोन्ही डब्यांमधून पटापट खाली उतरण्याचा निर्णय घेतला. तब्बल ३५ मिनिटांनंतर धूर आटोक्यात आणला आणि गाडीने नाशिककडे प्रस्थान केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.