नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात येणाऱ्या अप्पारावपेट परीसरात गोरक्षक कार्यकर्त्यांवर कसायांनी सशस्त्र हल्ला केला आहे. ह्या हल्ल्यात एका गोरक्षकाचा मृत्यू झाला असून, इतर ६ जखमी झाले आहेत. जखमी गोरक्षकांना नांदेडला पुढील उपचारासाठी पाठवले आहे. ही घटना दि.२० जूनच्या रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली असून, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्राणी सुरक्षा कायद्यानुसार गोहत्या करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. असे असताना देखील महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणात गाई, बैल, कालवड यांसह अन्य पशूंची रात्री मोठ्या व छोट्या वाहनांतून तस्करी केली जाते आहे. दि २० च्या मध्यरात्री एका टेम्पोमधून गोधन तस्करी होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यावर पाळत ठेऊन गोरक्षकांनी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास हा टेम्पो अडवून गोधन वाचविण्यासाठी पुढे आले होते. यावेळी त्या टेम्पोच्या पाठीमागून वाहनांतून आलेल्या कसायांच्या समर्थकांनी गोरक्षकांवर सशस्त्र हल्ला चढविला.
(हेही वाचा – Honduras Prison Riot : तुरुंगात उसळली दंगल, ४१ महिला कैद्यांचा मृत्यू)
गोवंशाची तस्करी करणाऱ्या कसायाच्या हल्ल्यात शेखर रामलु रापेल्ली या गोरक्षकाचा मृत्यू झाला असून, गंभीर जखमीमध्ये महेश कोंडलवाड – जिल्हा गोरक्षा प्रमुख किनवट, ज्ञानेश्वर कार्लेवाड, विशाल चिनन्ना मेंडेवाड, विठ्ठल लक्ष्मण अनंतवार तर किरकोळ जखमीमध्ये बालाजी राऊलवाड, सुर्यकांत कार्लेवाड यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच नांदेड विभागाचे गोरक्षक किरण बीचेवार यांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी नेलं असून, मोठ्या प्रमाणावर पोलीस कुमक घटनास्थळी पोहचले. यानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community