यंदा बर्फवृष्टी, पाऊस आणि गारपिटीमुळे पूर्ण हवामान (Environment) बदलले आहे. शनिवारी देशातील ८ राज्यांतील अनेक जिल्ह्यांत पाऊस आणि गारपीट झाली. हीच स्थिती हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व जम्मू-काश्मिरातही कायम होती. तथापी पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांत अनेक ठिकाणी पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पाकिस्तानवर आणि पंजाबवर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय राहिले, तर दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेशपर्यंत एक टर्फलाइन तयार झाली आहे. यामुळे पाऊस आणि गारपीट होण्याची स्थिती निर्माण होत आहे.
(हेही वाचा Uddhav Thackeray : अब की बार भाजपा तडीपार; उद्धव ठाकरे यांचा नारा)
दिल्ली : राज्यात रविवारी सकाळी पाऊस झाला. राष्ट्रीय राजधानी व एनसीआरमध्ये पावसाचा हा लागोपाठ तिसरा दिवस आहे.
Join Our WhatsApp Community