Powai Lake मधील आतापर्यंत काढली केवळ ५५ टक्केच जलपर्णी

पवई तलावातील एकूण सुमारे २४ हजार ९८५ मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटवणे अपेक्षित आहे.

387
Powai Lake मधील आतापर्यंत काढली केवळ ५५ टक्केच जलपर्णी

पवई तलाव परिसराचे नैसर्गिक जतन आणि पुनरुज्जीवन प्रकल्‍प अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तलावातील जलपर्णी, तरंगत्‍या वनस्‍पती काढण्‍याची कार्यवाही सुरु आहे. एकूण सुमारे २४ हजार ९८५ मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटवणे अपेक्षित आहे. त्यापैकी, बुधवारी २२ मे २०२४ पर्यंत सुमारे १३ हजार ९२० मेट्रिक टन म्हणजे ५५ टक्के इतकी जलपर्णी काढण्यात आली आहे. (Powai Lake)

पवई तलावातील जलपर्णी काढण्याचे काम ८ मार्च २०२४ पासून सुरू आहे. कार्यादेशाप्रमाणे एकूण सुमारे २४ हजार ९८५ मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटवणे अपेक्षित आहे. त्यापैकी, आज दिनांक २२ मे २०२४ पर्यंत सुमारे १३ हजार ९२० मेट्रिक टन म्हणजेच सुमारे ५५ टक्के इतकी जलपर्णी काढून क्षेपण भूमीवर वाहून नेण्यात आली आहे. (Powai Lake)

पवई तलाव परिसराला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी नुकतीच भेट देऊन उपाययोजनांची पाहणी केली होती. विशेषत्वाने तलावातील जलपर्णी काढण्यासाठी सुरू केलेल्या कार्यवाहीचा त्‍यात समावेश होता. ही कार्यवाही करताना नैसर्गिक बाबींचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी अभ्यासकांची मदत घेण्याची सूचना त्यांनी केली होती. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही केली आहे. (Powai Lake)

(हेही वाचा – Covid-19 New Variant: भारतात 290 जणांना कोविडच्या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग, आरोग्य तज्ज्ञ म्हणाले…)

जलपर्णी काढण्याच्या कामामध्ये तलावातील जलपर्णी व इतर तरंगत्या वनस्पती काढणे व त्याची क्षेपणभूमीवर विल्हेवाट लावणे इत्यादी बाबींचा समावेश आहे. तलावातील गाळ उपशाचे अथवा काठावरील झाडीझुडपे इत्यादी काढण्याच्या बाबींचा त्यात समावेश नाही, ही बाब महानगरपालिकेच्या वतीने ‘बॉम्‍बे नॅचरल हिस्‍ट्री सोसायटी’ संस्‍था सदस्‍यांच्या निदर्शनास आणून देण्‍यात आली. (Powai Lake)

पवई तलावातील जलपर्णी काढण्याची कार्यवाही महानगरपालिकेने सुरु केल्यानंतर काही निसर्ग अभ्यासक, पक्षी अभ्यासक, पक्षी निरीक्षक यांनी महानगरपालिका प्रशासनाला काही सूचना केल्या होत्या. त्याची तत्काळ दखल घेण्यात आली. या सुचनांचा यथायोग्य समावेश जलपर्णी काढण्याच्या कामांमध्ये करता यावा, यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी तसेच बॉम्‍बे नॅचरल हिस्‍ट्री सोसायटी संस्‍थेचे पदाधिकारी यांनी शनिवारी १८ मे २०२४ रोजी पवई तलाव क्षेत्रात भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर, महत्त्वपूर्ण निरीक्षणांसह स्‍थळ पाहणी अहवाल महानगरपालिका प्रशासनाला सादर करण्यात आला. (Powai Lake)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.