- विशेष प्रतिनिधी, मुंबई
दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील लाल मातीच्या प्रश्नावरुन उठलेल्या धुरळा खाली शमवण्यासाठी आयआयटीच्या तज्ज्ञ मंडळींच्यावतीने अभ्यास केला जात असला तरी प्रत्यक्षात ही लाल माती काढायची झाल्यास यावर वाळू मिश्रित मातीचा उतारा केला जाण्याची दाट शक्यता आहे. येत्या सोमवारी अथवा मंगळवारी महापालिका आयुक्तांसमवेत आयआयटीच्या प्राध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत शिवाजी पार्कसंदर्भातील लाल मातीसंदर्भात सादरीकरण केले जाण्याची शक्यता आहे. (Shivaji Park)
(हेही वाचा – मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक; राज्यपाल C. P. Radhakrishnan यांचे विधान)
दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजी पार्कमधील उडणाऱ्या लाल मातीच्या समस्येमुळे स्थानिक नागरिक त्रस्त असून या मैदानावर टाकयात आलेली लाल माती काढून टाकण्यात यावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी आयआयटीच्या माध्यमातून अभ्यास अहवाल तयार करून त्यानंतरच निर्णय घेतला जाईल असा निर्धार केला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयात आयआयटीच्या तज्ज्ञांसमोर याचे सादरीकरण झाले. त्यानंतर आता महापालिका आयुक्तांसमवेत येत्या सोमवारी अथवा मंगळवारी बैठक पार पडून त्यामध्ये यासंदर्भातील सादरीकरण केले जाईल, अशी माहिती मिळत आहे. (Shivaji Park)
(हेही वाचा – BEST Bus : बेस्टची बस थेट चहाच्या टपरीवर)
मात्र, लाल माती काढण्याबाबत अभ्यास अहवालातून समोर आल्यास यावरील लाल माती काढण्याची वेळ आली तर यावर भविष्यात लाल मातीपासून निर्माण होणारी समस्या टाळण्यासाठी रेती तथा वाळू मिश्रित मातीचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. लाल मातीवर वाळू मिश्रित मातीचा उतारा केला जाण्याची शक्यता असल्याने आयआयटीच्या अहवालात काय निष्कर्ष काढला जातो आणि काय सूचना केल्या जातात, यावर सर्वांचे लक्ष लागू आहे. (Shivaji Park)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community