मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात मागील काही दिवसांपासून हवेत उडणाऱ्या मातीतील ‘धूळ;धाणमुळे (Dust) राहिवासी हैराण झाले होते. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांना मातीतील धुळीचा त्रास होत होता. त्रस्त रहिवाशांनी लोकसभा निवडणुकीआधी आधी कायमस्वरूपी यावर तोडगा काढावा अन्यथा लोकसभा मतदानावर बहिष्कार (Election Boycott) टाकण्यात येईल, असा इशारा शिवाजी पार्क सिटीझन फोरमकडून देण्यात आला होता. दरम्यान महानगरपालिकेने यावर तोगडा काढला असून, मतदानाचा बहिष्कार टाकण्याचा निर्णय सिटीझन फोरमकडून मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
शिवाजी पार्क मैदानात अनेक खेळपट्ट्या असून क्रिकेटचे सराव आणि सामने होतात. तसेच फेरफटका मारण्यासाठी अनेक जण पार्कात येतात. मैदानातील माती मोठ्या प्रमाणात उडाल्याने त्याचा मोठा त्रास स्थानिकांना होतो. नागरिकांना याचा त्रास होऊ नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) मैदानातील हिरवळ कायम ठेवणे, धूळ उडण्याचे प्रमाण कमी करणे यासाठी शिवाजी पार्कचे नूतनीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने साधारण नऊ वर्षांपूर्वी घेतला होता.
(हेही वाचा – Maharashtra Weather Forecast: ढगाळ वातावरणासह तापमानात घट; मुंबईत तुरळक पावसाची शक्यता)
त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाल माती टाकली होती. या मातीवर पाण्याची फवारणी करणे आणि हिरवळ फुलवण्यासाठीही पाण्याची गरज असल्याने पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प (Rainwater Harvesting Project) उभारण्यात आला. मात्र प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झालाच नाही. त्यामुळे मैदानातील माती उडून ती धूळ परिसरातील रहिवाशांच्या घरात जाऊ लागली. तसेच महापालिकेने शिवाजी पार्कमधील धूळ प्रदूषण रोखण्यासाठी मैदानातील हवेत उडणारी माती व्हॅक्यूमच्या सहाय्याने ट्रकमध्ये जमा करण्याचा प्रयोग सुरू केला. सकाळी ११ वाजल्यापासून काम करताना दुपारपर्यंत हे काम सुरू केले. मागील दोन महिन्यांत साधारण २० ते २५ ट्रक मातीही काढण्यात आली आहे. परिणामी, धूळ प्रदूषण कमी होऊ लागले आहे.
(हेही वाचा – Devendra Fadanvis : मुंबईतून मराठी माणूस हद्दपार!, फडणवीस यांनी कुणावर साधला निशाणा
महागरपालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजणांमुळे काही प्रमाणात माती उडून धूळ उडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लोकसभा मतदानावरील बहिष्काराचा निर्णय मागे घेत मोठ्या मोठ्याप्रमाणात मतदान करण्याचे आवाहन समाजमाध्यमांद्वारे करण्यात येत आहे. असे विधान सिटीझन फोरमचे (Citizen Forum) सदस्य प्रकाश बेलवाडे यांनी केले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community