… तर ठरलं मग, ऑगस्ट महिन्यात Chenab Bridge वरून धावणार पहिली रेल्वे

162
... तर ठरलं मग, ऑगस्ट महिन्यात Chenab Bridge वरून धावणार पहिली रेल्वे
... तर ठरलं मग, ऑगस्ट महिन्यात Chenab Bridge वरून धावणार पहिली रेल्वे

JJHJजगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलावर रेल्वे गाड्या धावण्यासाठीची प्रदीर्घ प्रतीक्षा आता संपायला आली आहे. भारतीय रेल्वेने 15 ऑगस्टपासून रियासी ते सांगलदन दरम्यान नियमित रेल्वे सेवा सुरू करणार आहे. काश्मीर रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक भाग म्हणून ही सेवा सुरू केल्याने प्रवाशांना जम्मूमधील रियासी ते काश्मीरमधील बारामुल्ला असा प्रवास करता येणार आहे. (Chenab Bridge)

20 जून रोजी या पुलावर ट्रेनची ट्रायल रन झाली. यापूर्वी 16 जून रोजी या पुलावर इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी घेण्यात आली होती. हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा 29 मीटर उंच आहे. आयफेल टॉवरची उंची 330 मीटर आहे, तर 1.3 किमी लांबीचा हा पूल चिनाब नदीवर 359 मीटर उंचीवर बांधण्यात आला आहे. हा पूल 40 किलोपर्यंतची स्फोटके आणि 8 रिश्टर स्केलपर्यंतचे भूकंप सहन करू शकतो. पाकिस्तानी सीमेपासून त्याचे हवाई अंतर केवळ 65 किमी आहे. हा पूल उघडल्यानंतर काश्मीर खोरे भारताच्या इतर भागांशी प्रत्येक मोसमात ट्रेनद्वारे जोडले जाईल.

(हेही वाचा – Lakhbir Singh Sandhu News : खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग संधूच्या मुख्य साहाय्यकाला अटक)

यूएसबीआरएल प्रकल्प 1997 मध्ये सुरू झाला. याअंतर्गत 272 किमीचा रेल्वेमार्ग टाकण्यात येणार होता. आतापर्यंत विविध टप्प्यात 209 किमीची लाईन टाकण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस, रियासी ते कटरा जोडणारी शेवटची 17 किमीची लाईन टाकली जाईल, त्यानंतर प्रवाशांना जम्मूमधील रियासी ते काश्मीरमधील बारामुल्ला असा प्रवास करता येईल.  (Chenab Bridge)

चिनाब पूल 120 वर्षे भूकंप, पूर आणि बर्फवृष्टी सहन करू शकतो

काश्मीर खोऱ्यात सर्व हवामान प्रवेश देण्यासाठी भारत सरकारने 35,000 कोटी रुपये खर्चून उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प सुरू केला आहे. या योजनेअंतर्गत हा पूल बांधण्यात आला आहे. केंद्र सरकारने एक भारत श्रेष्ठ भारत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत चिनाब नदीवर या पुलाचे बांधकाम सुरू केले होते.

(हेही वाचा – Samsung कडून भारतात गॅलॅक्‍सी वॉच७, गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा, बड्स३ सिरीज लाँच)

जगातील सर्वात उंच पूल भूकंप, पूर, बर्फवृष्टी आणि स्फोटकांपासून संरक्षण करण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे. पुलाचे क्षेत्र भूकंप झोन चारमध्ये येते, परंतु ते भूकंप झोन पाचसाठी डिझाइन केले गेले आहे, म्हणजेच तो भूकंपांपासून पूर्णपणे सुरक्षित आहे आणि रिश्टर स्केलवर 8 तीव्रतेच्या भूकंपाचाही सहज सामना करू शकतो. हा पूल पुढील 120 वर्षांसाठी बांधण्यात आला आहे. (Chenab Bridge)

हेही पाहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.