अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर दररोज असंख्य वस्तूंची खरेदी होत असते. ब्रॅण्डेड वस्तू स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने ग्राहक या प्लॅटफॉर्मवरील वस्तूंना पसंती देतात. पण ब्रॅण्डेडच्या नावाखाली बनावट वस्तूंची विक्री या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गेल्या वर्षभरात अमेझॉनवर 11 टक्के, स्नॅपडीलवर 12 तर मेशो आणि फ्लिपकार्टवर अनुक्रमे 8 आणि 6 टक्क्यांच्या बनावट वस्तूंची विक्री झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरून ही माहिती समोर आली आहे.
(हेही वाचा: मोबाईल हरवला तर पोलिसांच्या ‘या’ अॅपवर करा तक्रार )
न्यायालयाचे आदेश
बनावट वस्तूंच्या विक्रीचा हा काळाबाजार थांबवण्यासाठी आपल्या प्लॅटफॉर्मवरील अशा वस्तूंची यादी सादर करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने अमेझॉन, स्नॅपडील, मेशो यांसारख्या इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मना दिले आहेत. एका याचिकेवर सुनावणी देताना, न्यायमूर्ती प्रदीपसिंह यांनी हे आदेश दिले. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अशा वस्तूंच्या विक्रीला पाठबळ दिले जात असून, त्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
(हेही वाचा: ॲमेझॉन पाठोपाठ मिशो एप्लिकेशन विरोधातही पोलीस ठाण्यात गुन्हा)
सोशल मीडियावरून सुद्धा फसवणूक
तब्बल 51 लाख कोटी रुपयांच्या बनावट उत्पादनांचा हा जागतिक बाजार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच 38 टक्के भारतीय खरेदीदारांना या वस्तू विकल्या गेल्या आहेत. इतकंच नाही तर फेसबूक, इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा मोठ्या ब्रँडचे टॅग लावून बनावट वस्तू विकल्या गेल्याचे समोर आले आहे. 30 हजारांपेक्षा जास्त इन्स्टाग्राम पेजवरून, तर 56 हजार फेसबूक पेजवरून ही विक्री करण्यात आली आहे.
(हेही वाचा: ATM ट्रांजेक्शन अपूर्ण, तरीही पैसे कट झाले? काय कराल)
Join Our WhatsApp Community