सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवाद पसरण्याची केंद्राला भीती

94

देशात सध्या सोशल मीडियाचा जोर आहे. या नियंत्रण नसलेले माध्यम देशात दहशतवाद पसरण्यास कारणीभूत ठरेल. यामुळे भारताची एकता आणि अखंडता धोक्यात येईल, अशी भीती मंगळवारी, १३ डिसेंबर रोजी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात गृह मंत्रालयाने व्यक्त केली.

काय म्हटले सरकारने?

सोमवारी, १२ डिसेंबर रोजी सरकारने पाकिस्तानस्थित ओटीटी प्लॅटफॉर्मची वेबसाइट, दोन मोबाइल अॅप्स, चार सोशल मीडिया खाती आणि स्मार्ट टीव्ही अॅपवर बंदी घालण्याच्या सूचना जारी केल्या, या प्लॅटफॉर्मद्वारे दाखवल्या जाणार्‍या वेब सीरिजमुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि अखंडतेला हानी पोहोचू शकते, असे सरकारने म्हटले आहे. विडली टीव्हीने 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सेवक: द कन्फेशन्स नावाची वेब सिरीज प्रसिद्ध केली होती, जी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला हानिकारक असल्याचे आढळून आल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले. तसेच, या वेब सिरीजचे आतापर्यंत तीन भाग रिलीज करण्यात आले आहेत, असेही मंत्रालयाने सांगितले. दरम्यान, मंत्रालयातील वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी ट्विट केले की, पूर्णपणे बनावट वेब सिरीज केल्यानंतर पाकिस्तानस्थित विडली टीव्हीवर कारवाई करण्यात आली.

(हेही वाचा शरद पवारांचा वाढदिवस, सर्व पवार कुटुंबीय उपस्थित, पण रोहित पवार…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.