शहापुरात मातीचा भराव रेल्वे ट्रॅकवर, कल्याण-कसारा दरम्यान Central Railway अनिश्चित काळासाठी बंद

शहापूर येथे निर्माण झालेल्या पुरसदृष्य परिस्थितीमुळे रेल्वे रूळांवरही पाणी साचले आहे. आटगाव, तानशेत दरम्यान रेल्वे ट्रॅकवर झाड पडले आहे. त्यामुळे कसाऱ्याकडे येणारी Central Railway वाहतूक ठप्प झाली आहे.

658
Central Railway : मुसळधार पावसामुळे मेल/एक्सप्रेस गाड्या रद्द

शहापूर तालुक्यात शनिवार, ६ जुलै रोजी रात्रीपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे भारंगी नदीला पूल आला असून या पुराचे पाणी शहरात शिरले आहे. शहापूर येथे निर्माण झालेल्या पुरसदृष्य परिस्थितीमुळे रेल्वे रूळांवरही पाणी साचले आहे. आटगाव, तानशेत दरम्यान रेल्वे ट्रॅकवर झाड पडले आहे. त्यामुळे कसाऱ्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. (Central Railway)

(हेही वाचा – IND vs ZIM 1st T20 Match: टीम इंडियाची ‘यंग ब्रिगेड’ झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ठरली अपयशी!)

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे OHE पोल वासिंद-खडवली दरम्यान KM 78/3 येथे कलंडला आहे. मुसळधार पावसामुळे कल्याण ते कसारा दरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. कसारा ते सीएसएमटी वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

शहापुरातील (Shahapur) पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. मातीचा भराव रेल्वे ट्रॅकवर आल्याने रेल्वे रूळांवर पाणी आणि माती साचली आहे. तर, एकीकडे आटगाव आणि तानशेत दरम्यान रेल्वे ट्रॅकवर झाड पडले आहे. वासिंद खडवली येथे OHE पोल एकीकडे झुकला असल्याने कल्याण ते कसारा दरम्यानची रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी बंद असणार आहे.

शहापूर तालुक्यात वाहून गेला पूल

शहापूर तालुक्यात काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भारंगी नदीला पूर आला असून या पुराचे पाणी शहापूर शहरात शिरले आहे. त्यामुळे शहापूर शहरील अनेक इमारतींमधील पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आले असून अनेक वाहने पाण्याखाली आली आहेत. काही वाहने पाण्यात वाहून गेली आहेत. रस्त्याला नदीचे स्वरूप आलं आहे. पहिल्याच पावसात संपूर्ण शहापूर तालुक्यात पूरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आसनगांव – माहुली रोडवरील पूल वाहून गेला आहे. महिनाभरापूर्वीच या पुलाचं बांधकाम झाले होते. (Central Railway)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.