दारुच्या दुकानांनंतर आता ताडीच्या दुकानांनाही नागरिकांकडून विरोध केला जात आहे. सोलापूरमधील जुना विडी घरकुल येथील दोन्ही ताडी दुकानांना नागरिकांनी विरोध दर्शवत जिल्हा प्रशासनापुढे तक्रारी मांडल्या. त्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना दिले.
अन्यथा रस्त्यावर उतरु
या निवेदनात म्हटले की, भाजी मंडई, विडी कारखाने, मंदिर या परिसरातच ही दुकाने थाटण्यात येत आहेत. त्याने परिसरातील नागरिकांना उपद्रव होईल, रासायनिक ताडीने लोकांचे जीव जातील, तरुण व्यसनाधीन होतील. कुठल्याही स्थितीत या दोन्ही दुकानांना परवानगी देऊ नये, दिल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील.
( हेही वाचा :नथुराम साकारणाऱ्या कोल्हेंचे शरद पवारांकडून समर्थन! म्हणाले…)
हा रहदारीचा रस्ता आहे
युनिक टाऊनमधील नागरिकांनी तक्रारीसाठी पुढाकार घेतला. नगरसेवक विठ्ठल कोटा यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या शिष्टमंडळाने तक्रारींचे निवेदन दिले. पोशम्मा मंदिर परिसरातील पटांगणात भाजी मंडई सुरू झाली. त्याच्या समोरच स्व. विष्णुपंत कोठे यांच्या नावाने बाग फुलवण्यात आली. त्याच्या समोरच ताडी दुकानासाठी पत्राशेड मारले. रस्त्यालगत असलेल्या या शिंदीखान्यामुळे या परिसरातील लोकांना काय त्रास होईल, याची कुठलीच कल्पना यंत्रणेने केलेली नाही. गांधीनगरकडे जाणारा हा रहदारीचा रस्ता आहे. यंत्रमाग कामगार, विडी कामगार, विद्यार्थी याच रस्त्याने ये-जा करतात. याचाही विचार झालेला नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community