कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहे. वाढत्या संक्रमामुळे भारती विद्यापीठाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेण्यासंदर्भात शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने प्राचार्य डॉ. एस.बी.सावंत यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख लहू गायकवाड, महाराष्ट्र रिक्षा सेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख सुरेश जगताप, विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख तुषार आवताडे यांनी निवेदन देत विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडल्या.
विद्यार्थीहिताचा निर्णय घ्यावा
विद्यार्थ्यांचे कोविडचे दोन डोस पूर्णपणे झालेले नाहीत. एस.टी. महामंडळाचा संप यासोबतच सध्या वाढत असलेला ओमायक्राॅनचा धोका यामुळे विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. विद्यार्थ्यांच्या तासिकासुध्दा ऑनलाइन झाल्या आहेत. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेऊन विद्यार्थीहिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
( हेही वाचा : आता भारतातही तबलिगी जमातवर बंदीची मागणी! ट्वीटरवर सुरू झाला ट्रेंड )
लसीकरण आवश्यक
महाराष्ट्रात लसीकरण पूर्ण झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांना महाविद्यालयात येण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळेच ज्या विद्यार्थ्यांचे अद्यापही पूर्ण लसीकरण झालेले नाही अशा, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. म्हणून सोलापूर विद्यापीठाच्या धर्तीवर भारती विद्यापीठानेही परीक्षा ऑनलाइन घ्यावा असे निवेदन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community