राज्यातील जवळपास ६७ लाख शेतकऱ्यांना २०२१-२२ मधील रब्बी व खरीप हंगामात २० हजार ५८४ कोटींचे पीककर्ज वाटप करावे, असे टार्गेट राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने दिले होते. पण, ३१ मार्चपर्यंत राज्यातील ३१ जिल्हा बॅंकांपैकी दहा बॅंकांनी ८० टक्क्यांपेक्षा कमी कर्जवाटप केल्याची माहिती राज्य बॅंकेकडून देण्यात आली. त्यामुळे राज्यातील जवळपास सात लाख शेतकऱ्यांना विशेषत: कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना बॅंकांकडून पीककर्ज मिळू शकले नाही.
( हेही वाचा : बेस्टच्या कार्डने आता करा मेट्रो-रेल्वे प्रवास! हे कार्ड कुठे मिळणार, किंमत किती? )
कर्जवाटपामध्ये राज्यात अव्वल
दरम्यान, सोलापूर जिल्हा बॅंक कर्जवाटपामध्ये राज्यात अव्वल आहे. राज्यातील शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या दारात जाण्याची वेळ येऊ नये, शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, शेतीच्या प्रगतीसाठी हातभार लागावा या हेतूने राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीकडून दरवर्षी कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले जाते. राज्यातील ३१ जिल्हा बॅंकांनी शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जवाटप करणे अपेक्षित असते. मात्र, बॅंकांकडून कर्ज घेऊन कर्जमाफीची वाट पाहणारे बरेच शेतकरी आहेत. दुसरीकडे प्रोत्साहनपर अनुदान व दोन लाखांवरील शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही.
Join Our WhatsApp Community