सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटन क्षेत्र घोषित करणार – मंगलप्रभात लोढा

215
सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटन क्षेत्र घोषित करणार - मंगलप्रभात लोढा

सोलापूर शहर जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाजुला अनेक धार्मिक तीर्थक्षेत्रे आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करणार. तसेच सोलापूर येथे प्रथमच सुरू झालेल्या हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी कॉलेजला श्री स्वामी समर्थांचे नाव देण्यात येणार असल्याचे राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी (३ जुलै) सांगितले.

पर्यटन विभागाच्या वतीने या कॉलेजच्या पदवी पदविका अभ्यासक्रमाचा शुभारंभ लोढा यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, सचिन कल्याणशेट्टी, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. भगवतंराव पाटील, व्यवस्थापकिय संचालक श्रध्दा जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आदी उपस्थित होते.

(हेही वाचा – अजित पवारांच्या येण्यामुळे महायुतीला अधिक ताकद मिळेल – उद्योग मंत्री उदय सामंत)

आपल्या राज्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांचे आदरातिथ्य चांगले व्हावे, पर्यटनासाठी आलेले जास्त दिवस राहावेत यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे ते प्रशिक्षण या कॉलेजच्या माध्यमातून मिळणार आहे असे मंत्री लोढा यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यात धार्मिक तीर्थस्थळे मोठ्याप्रमाणात आहेत. कामगारांची संख्या अधिक आहे. याची सांगड घालून पर्यटनासाठी आलेल्यांकडून या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. सोलापूर जिल्ह्याला धार्मिक पर्यटनाचा दर्जा मिळाल्यास रोजगारांच्या संधी आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे, असेही लोढा म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.