सोलापूर विभागात रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे काम, ‘या’ गाड्या रद्द

सोलापूर विभागात रेल्वेच्या विस्ताराला गती मिळत आहे. या विभागामध्ये सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत, भाळवणी ते भिगवा स्थानकादरम्यान धावणा-या काही विशेष रेल्वे गाड्या रद्द, तर काही इतर मार्गांवर वळवल्या जातील, असा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

मार्गबदल करण्यात येणा-या रेल्वे

 • एलटीटी-मदुराई साप्ताहिक विशेष गाडी २० व २७ ऑक्टोबरला रोहा-मडगाव-मंगलुरू जं-शोरानूर-पलक्कड-इरोड-तिरूचिरापल्ली जं. या मार्गावरून धावेल.
 • मदुराई- एलटीटी साप्ताहिक विशेष गाडीचा मार्गबदल २२ ऑक्टोबरला तिरूचिरापल्ली जं.- इरोड-पलक्कड-शोरानूर-मंगलुरू जं.-मडगाव-रोहा
 • भुवनेश्वर-पुणे साप्ताहिक विशेष १९ व २६ ऑक्टोबरला वाडी-सोलापूर-कुर्दुवाडी-मिरज-पुणे या मार्गावरून धावेल.
 • पुणे-भुवनेश्वर साप्ताहिक विशेष गाडीचा मार्गबदल २१ ऑक्टोबरला पुणे-मिरज-कुर्दुवाडी-सोलापूर-वाडी
 • नागरकोइल-सीएसएमटी मुंबई स्पेशल गाडीचा १८ ते २६ ऑक्टोबरपर्यंत डिंडीगुल-नामक्कल-इरोड-पलक्कड-शोरानूर-मंगलुरू जं.-मडगाव-रोहा-पनवेल-ठाणे असा मार्गबदल करण्यात येईल.
 • सीएसएमटी मुंबई-नागरकोइल स्पेशल गाडीचा १९ ते २७ ऑक्टोबरपर्यंत ठाणे-पनवेल-रोहा-मडगाव-मंगलुरू जं-शोरानूर-पलक्कड-इरोड-नामक्कल-डिंडीगुल असा मार्गबदल करण्यात येईल.

 • नागरकोइल-सीएसएमटी मुंबई स्पेशल (व्दी-साप्ताहिक) २१ व २४ ऑक्टोबरला तिरूचिरापल्ली जं.- इरोड-पलक्कड-शोरानूर-मंगलुरू जं.-मडगाव-रोहा-पनवेल-ठाणे या मार्गावरून धावेल.
 • सीएसएमटी मुंबई-नागरकोइल स्पेशल(व्दी-साप्ताहिक) १८ ते २५ ऑक्टोबरपर्यंत ठाणे-पनवेल-रोहा-मडगाव-मंगलुरू जं-शोरानूर-पलक्कड-इरोड-तिरूचिरापल्ली या मार्गावरून धावेल.
 • एलटीटी-विशाखापट्टणम ही गाडी १८ ते २८ ऑक्टोबरपर्यंत एलटीटी-इगतपुरी-मनमाड-नांदेड-निजामाबाद-सिकंदराबाद या मार्गावर वळवण्यात येईल.
 • विशाखापट्टणम-एलटीटी स्पेशल गाडी १८ ते २६ ऑक्टोबरपर्यंत सिकंदराबाद-निजामाबाद-नांदेड-मनमाड-इगतपुरी-एलटीटी या मार्गावरून धावेल.
 • एलटीटी- कराइक्कल साप्ताहिक विशेष गाडी १६ व २३ ऑक्टोबरला पुणे-मिरज-हुबळी-यशवंतपुर- जोलारपेट्टई जं-कटपाडी-वेल्लोर-विल्लुपुरम या मार्गावरुन जाईल.
 • कराइक्कल-एलटीटी साप्ताहिक विशेष गाडी १८ व २५ ऑक्टोबरला विल्लुपुरम-वेल्लोर-कटपाडी-जोलारपेट्टई जं-यशवंतपुर-हुबळी-मिरज-पुणे या मार्गावरुन जाईल.
 • काकीनाडा पोर्ट-एलटीटी स्पेशल (व्दी-साप्ताहिक)१६ ते २३ ऑक्टोबरपर्यंत सोलापूर-कुर्दुवाडी-मिरज-पुणे या मार्गावरुन धावेल.
 • एलटीटी-काकीनाडा पोर्ट स्पेशल (व्दी-साप्ताहिक) १७ ते २४ ऑक्टोबरपर्यंत पुणे-मिरज-कुर्दुवाडी-सोलापूर या मार्गावर वळवण्यात येईल.

(हेही वाचाः ऑक्टोबरनंतर कोरोनाची तिसरी लाट…काय म्हणाले राजेश टोपे?)

रद्द केलेल्या गाड्या

१. सोलापूर-सीएसएमटी स्पेशल
२. सीएसएमटी-गाडग स्पेशल
३. गाडग- सीएसएमटी स्पेशल
४. सीएसएमटी- सोलापूर स्पेशल
५. सीएसएमटी- लातूर स्पेशल
६. लातूर- सीएसएमटी स्पेशल
७. सीएसएमटी- बिदर स्पेशल
८. बिदर -सीएसएमटी स्पेशल
९. नांदेड-पनवेल स्पेशल
१०. पनवेल-नांदेड स्पेशल
११. हैदराबाद – हडपसर स्पेशल
१२. हडपसर- हैदराबाद स्पेशल
१३. पुणे-सोलापूर-पुणे दैनिक स्पेशल
१४. मैसूर-साईनगर शिर्डी साप्ताहिक स्पेशल
१५. साईनगर शिर्डी- मैसूर साप्ताहिक स्पेशल

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here