नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट – १ च्या पथकाने (Solapur Drug Factory) सोलापूर येथील औद्योगिक वसाहतीत धाड टाकून मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट-१ व एन.डी.पी.एसच्या विशेष टास्क फोर्सने सोलापूरमध्ये शुक्रवार ३ नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा धाड टाकून तेथील अमली पदार्थांचे गोदाम उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे १ हजार ५० लिटर केमिकल व दीडशे ते दोनशे किलो पावडरसह सुमारे ३५ ते ४० लाखांचा मुद्देमाल या विशेष टास्क फोर्सच्या पथकाने जप्त केला आहे.
अधिक माहितीनुसार, (Solapur Drug Factory) नाशिक पोलिसांनी सोलापुरात दुसऱ्यांदा छापा मारून एमडी (मॅफेड्रॉन) तयार करण्याच्या साहित्याचे गोदाम उद्ध्वस्त केल्यानंतर तस्करीसंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापुरात तयार होणाऱ्या ‘एमडी’ची स्पीकर बॉक्समध्ये भरून तस्करी व्हायची. या मालाची सनी पगारे नाशिकमध्ये विक्री करायचा. त्यानुसार पोलिसांनी दोन मोठे स्पीकर्सचे बॉक्स व ‘एमडी’चा ३५ ते ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
(हेही वाचा – World Cup 2023 : दिल्लीतील प्रदूषणामुळे बांगलादेश पाठोपाठ श्रीलंकन संघानेही केला सराव रद्द)
सामनगाव एम. डी. प्रकरणातील संशयित (Solapur Drug Factory) सनी पगारे याने सोलापूरमध्ये सुरू केलेला हा कारखाना आठ दिवसांपूर्वी उद्ध्वस्त केला होता. या प्रकरणात नाशिकच्या मनोहर काळे या संशयिताला पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार सनीच्या सांगण्यावरून २० हजार रुपये दरमहा नफ्यासाठी कारखान्याचा कायदेशीर करार केला होता. त्याआधारे गुरुवारी वैजनाथ आवळे याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता आवळेने दिलेल्या माहितीनुसार कारखान्यासाठी लागणारा लाखो रुपयांचा कच्चा माल एका गोदामात असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर (Solapur Drug Factory) विशेष टास्क फोर्सच्या पथकाने सोलापूर तालुक्यातील कोडी या गावातील गोदामातून लाखो रुपयांचा कच्चा माल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष टास्क फोर्सचे प्रमुख विजय ढमाळ व त्यांच्या पथकाने केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community