सोलापूर शहरातील एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. ही आग नक्की कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका टेक्स्टाईल कारखान्याला आग लागल्याने तिघांचा मृत्यू झाला. रुपम विविंग मिल असे या कारखान्याचे नाव असून आज म्हणजेच बुधवार ५ जुलै रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास या कारखान्यामध्ये आग लागली.
मनोज लक्ष्मीधर देहुरी, (वय २०, रा. ओडिसा), आनंद लक्ष्मीनारायण बगदी (वय ३०, रा. पश्चिम बंगाल) सहदेव बुद्धवार बगदार (वय २२, रा. पश्चिम बंगाल) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तिघा परप्रांतीय कामगारांची नावे आहेत. रुपम विविंग मिल या कारखान्याच्या तळमजल्यावरती मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. याच मजल्यावर कामगाऱ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. या ठिकाणी कामगारांनी आपल्या स्वयंपाकासाठी गॅस शेगडी, इलेक्ट्रिक शेगडी इत्यादी सामान ठेवले होते. याच मजल्यावर पॅकेजिंगसाठी लागणारे रिकामे पुठ्ठे देखील ठेवण्यात आले होते. अग्निशनम दलाच्या प्राथमिक अंदाजानुसार स्वयंपाक करताना स्फोट झाल्याने ही आग लागली होती.
(हेही वाचा – मुख्यालयातील बंद पक्ष कार्यालयांना वाळवी?)
आज सकाळी सहाच्या सुमारास इथे असलेल्या कामगारांपैकी एकाने स्वयंपाक करण्यासाठी गॅस पेटवला. याच वेळेस अचानक आग लागली. या कामगाराने तिथे असलेल्या पुट्टे आणि टॉवेलच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने अधिकच भडका घेतल्याने त्याने तिथून पळ काढला. मात्र यावेळी शेजारी असलेले एका खोलीत तीन कामगार झोपलेले होते. आगीने अचानक रौद्ररूप धारण केल्याने या तिघांना तिथून निघणे शक्य झाले नाही. त्यामुळे या तिघाही कामगारांचा आगीने होरपळून तसेच श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community