सोलापूरच्या विकासासाठी बहुप्रतीक्षेत असलेली सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू करण्यात येईल. त्यासंबंधीचा निर्णय झाला असून, दिवाळीनंतर त्याला हिरवा सिग्नल दाखविण्यात येईल, अशी आशा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याशी बोलताना व्यक्त केली.
( हेही वाचा : फक्त १४९९ रुपयांमध्ये करा हवाई प्रवास! ‘या’ विमान कंपनीची शानदार ऑफर )
मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची ग्वाही
मंगळवारी संसदेच्या रेल्वे मंत्रालयाच्या कक्षात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी मुंबई – सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिली. यासह रेल्वे संदर्भातील अन्य मागण्यांबाबत चर्चा झाली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचीदेखील उपस्थिती होती.
७५ वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचा निर्णय
रेल्वे मंत्रालयाने देशात विविध भागात २०२३ पर्यंत ७५ वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी जवळपास आठ तास लागतात. सोलापूर येथून मुंबई व पुण्याला दर दिवशी जवळपास ५ ते ७ हजार प्रवासी शिक्षण, व्यापार व इतर कामानिमित्त प्रवास करत असतात. मुंबई-सोलापूर अशी वंदे भारत रेल्वे सुरू झाल्यास मुंबईहून पुण्यावरून सोलापूरला येणारे व सोलापूरहून वरील दोन्ही शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना हे अंतर निम्म्या वेळेत पार करता येणार आहे.
Join Our WhatsApp Community