यावर्षीचं पहिलं सूर्यग्रहण सोमवारी, (८ एप्रिल) दिसणार आहे. गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी होणाऱ्या या सूर्यग्रहणाचा प्रभाव संपूर्ण जगावर पडेल. हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, तर कॅनडा, अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतील काही देशांमधून हे पूर्ण सूर्यग्रहण पाहता येईल. युरोपातील काही देशांमध्ये आंशिक सूर्यग्रहण दिसेल, अशी माहिती देण्यात येत आहे.
भारतात कधी दिसणार?
तब्बल ५४ वर्षांनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या वेळेसाठी पूर्ण सूर्यग्रहण (Total Solar Eclipse) होणार आहे. यावेळी सुमारे ७ मिनिटांसाठी पूर्णपणे अंधार होईल. भारतीय वेळेनुसार, रात्री ९ वाजून १२ मिनिटांनी हे ग्रहण लागेल. भारतात हे ग्रहण दिसणार नसलं, तरी अंतराळात ‘आदित्य एल-१’ वर याचा काय परिणाम होईल? याविषयी नासाने सोशल मिडिया ‘एक्स’ वर माहिती प्रसिद्ध केली आहे.
(हेही वाचा – Sanjay Nirupam: मुलीच्या, पत्नीच्या नावे संजय राऊतांनी घेतली लाच; संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट)
आदित्य एल-१ वर नेमका काय होणार परिणाम?
आदित्य एल-१ हा सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात पाठवलेला भारताचा पहिलाच उपग्रह आहे. इस्रोकडून गेल्यावर्षी हा उपग्रह अंतराळात पाठवला होता. सुमारे ४ महिन्यांचा प्रवास करून आदित्य एल-१ लॅग्रेज पॉइंटवर पोहोचला होता. तिथून तो सातत्याने सूर्याचं निरीक्षण आणि अभ्यास करत आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या सूर्यग्रहणाचा त्याच्यावर नेमका काय परिणाम होईल, याचा अभ्यास शास्त्रज्ञ करत आहे.
लाईव्ह स्ट्रिमद्वारे थेट प्रक्षेपण…
नासाने ‘X’ या समाजमाध्यमाद्वारे सोमवारी होणाऱ्या सूर्यग्रहणाचे थेट प्रक्षेपण कसे पाहता येईल, याविषयी माहिती आणि लिंक दिली आहे. त्याद्वारे सूर्यग्रहणाचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community